PM Narendra Modi's Public Meeting in Dindori on 22nd | Sarkarnama

दिंडोरीत 22 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचार सभा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22 एप्रिलला दिंडोरी मतदारसंघासाठी पिंपळगाव बसवंत येथे सभा घेणार आहेत. भाजपच्या उमेदवारी डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ ही सभा होईल. उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता सकाळच्या सत्रातील सभांना गर्दी जमवणे सर्वच राजकीय पक्षांना अडचणीचे बनले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोंदीच्या सभेला होणारी गर्दी व ते काय बोलणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22 एप्रिलला दिंडोरी मतदारसंघासाठी पिंपळगाव बसवंत येथे सभा घेणार आहेत. भाजपच्या उमेदवारी डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ ही सभा होईल. उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता सकाळच्या सत्रातील सभांना गर्दी जमवणे सर्वच राजकीय पक्षांना अडचणीचे बनले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोंदीच्या सभेला होणारी गर्दी व ते काय बोलणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

विदर्भातील सात मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यामुळे भापचे बहुतांश नेत्यांनी आता राज्यातील अन्य मतदारसंघांकडे लक्ष वळवले आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तसेच शेजराच्या जिल्ह्यातील धुळे मतदारसंघ युतीच्या जागावाटपात भाजपकडे आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सभेचा लाभ या तिन्ही मतदारसंघांना होईल असा दावा प्रचारप्रमुख आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केला. दिंडोरी मतदारसंघातुन सलग तीन टर्म भाजपचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी निवडणुक जिंकली होती. यंदा मात्र त्यांना उमेदवारी न देता राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेल्या भारती पवार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपला येथे पक्षांतर्गत नाराजीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर या सभेला महत्व दिले जात आहे.

संबंधित लेख