PM Narendra Modi Praises IIT Mumbai | Sarkarnama

'आयआयटी' म्हणजे परिवर्तनाचे साधन दीक्षान्त कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे गौरवोद्‌गार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

भारतीय तंत्रज्ञान संस्थेला देशात, जगात 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी' म्हणून ओळखले जात असले, तर आज त्याची व्याख्या बदलली आहे. हे फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिली नाही, तर 'आयआयटी' म्हणजे "इंडियाज इन्स्ट्रुमेन्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन'' (भारताच्या परिवर्तनाचे साधन) झाले असल्याचे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले.

मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्थेला देशात, जगात 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी' म्हणून ओळखले जात असले, तर आज त्याची व्याख्या बदलली आहे. हे फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिली नाही, तर 'आयआयटी' म्हणजे "इंडियाज इन्स्ट्रुमेन्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन'' (भारताच्या परिवर्तनाचे साधन) झाले असल्याचे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले.

'आयआयटी' मुंबईच्या 56 व्या वार्षिक दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आदी उपस्थित होते. 'आयआयटी' मुंबईला केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाच्या वतीने एक हजार कोटी रुपयांचे साह्य देण्यात आले आहे. त्यातून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होणार असून, संशोधन आणि नावीन्यपूर्णतेवर विद्यार्थ्यांनी विशेष भर द्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले. 

मोदी म्हणाले, "गेल्या सहा दशकांत 'आयआयटी'ने केलेल्या निरंतर प्रयत्नांमुळे आज या संस्थेने देशातील नामांकित संस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. 'आयआयटी' आणि येथील पदवीधरांच्या उल्लेखनीय कार्याचा देशाला अभिमान आहे. 'आयआयटी'च्या यशाने देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची निर्मिती झाली, त्यांची 'आयआयटी' ही प्रेरणा आहे. त्यामुळे भारत हे जगातील सर्वांत मोठे तांत्रिक मनुष्यबळ असलेले केंद्र बनले आहे.'' 

2621 विद्यार्थ्यांना पदवीप्रदान
दीक्षान्त समारंभात 2621 विद्यार्थ्यांना विविध विषयांतील पदवी प्रदान करण्यात आली, तर 380 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीने सन्मानित करण्यात आले. "आयआयटी' मुंबई आणि मोनाश विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या पीएच.डी. अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मोनाश विद्यापीठाच्या कुलगुरू तथा अध्यक्ष प्रा. मार्गारेट गार्डनर यांच्या हस्ते 29 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. 

आयआयटी मुंबईचे देशातील नामांकित संस्थांमध्ये स्थान 
♦ भारत हे जगातील सर्वांत मोठे तांत्रिक मनुष्यबळ असलेले केंद्र 
♦ आयआयटी म्हणजे 'इंडियाज इन्स्ट्रुमेन्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन'

संबंधित लेख