PM Modi's Brother Leads Morcha in Aurangabad | Sarkarnama

पंतप्रधानांच्या बंधूंनाही मोर्चा काढावा लागतो तेव्हा.....

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेश दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या उपस्थितीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. प्रल्हाद मोदी या मोर्चासाठी कालच औरंगाबाद शहरात आले होते. खुल्ताबाद तालुक्‍यातील कसाबखेडा येथील एका पेट्रोल पंपाचे उद्धाटन केल्यानंतर त्यांनी वेरूळच्या आश्रमात जाऊन शांतीगिरी महाराजांची भेट घेऊन चर्चाही केली होती. त्यानंतर आज दुपारी बारा वाजता क्रांतीचौक येथून स्वस्त धान्य दुकानदारांच्या मोर्चाला सुरूवात झाली. प्रल्हाद मोदी यांच्यासह फेडरेशनचे देशभरातील पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी झाले होते. 

औरंगाबाद : महाराष्ट्र सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) निर्णयाला विरोध दर्शवत रोख सबसिडी नको, धान्य हवे या व अन्य मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 5) औरंगाबाद जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या उपस्थितीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेश दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या उपस्थितीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. प्रल्हाद मोदी या मोर्चासाठी कालच औरंगाबाद शहरात आले होते. खुल्ताबाद तालुक्‍यातील कसाबखेडा येथील एका पेट्रोल पंपाचे उद्धाटन केल्यानंतर त्यांनी वेरूळच्या आश्रमात जाऊन शांतीगिरी महाराजांची भेट घेऊन चर्चाही केली होती. त्यानंतर आज दुपारी बारा वाजता क्रांतीचौक येथून स्वस्त धान्य दुकानदारांच्या मोर्चाला सुरूवात झाली. प्रल्हाद मोदी यांच्यासह फेडरेशनचे देशभरातील पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी झाले होते. 

फडणवीस सरकारने घाई करू नये- मोदी
प्रसार माध्यमांनी तुम्ही पंतप्रधानांचे भाऊ असतांना स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्‍न का सुटत नाही असा सवाल केला, यावर ते म्हणाले, "लोकशाहीमध्ये आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात, आणि म्हणूनच मी इथे आलो आहे. आम्ही प्रयत्न करत राहणार यश देणे देवाच्या हाती आहे. आमच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे." डीबीटीचा कार्यक्रम हा केंद्र सरकारचा नाही, अद्याप संपुर्ण देशात तो लागू झालेला नाही. ज्या राज्यात लागू केला तिथे तो यशस्वी झालेला नाही. महिला बाल विकास मंत्रालयाच्या मेनका गांधीनी देखील याला विरोध केला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने डीबीटी लागू करण्याची घाई करू नये अशी आमची त्यांना विनंती असल्याचेही प्रल्हाद मोदी म्हणाले. 

केंद्रातील सरकार लोकशाहीवर चालणारे..
सध्या केंद्रात सत्तेव असणारे सरकार हे परिवारवादी नाही तर लोकशाहीवर चालणारे सरकार आहे. त्यामुळे माझे भाऊ पंतप्रधान असले तरी लोकशाही मागण्या पुर्ण करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, डोकेफोड करून घ्यावी लागते आणि मी त्यासाठीच इथे आलो आहे. आमचे हक्क आणि मागण्या मला रास्त मार्गाने मान्य करून घ्यायच्या आहेत, परिवारवाद किंवा नातेसंबंध दाखवून नाही असे देखील प्रल्हाद मोदी यांनी स्पष्ट केले. 

तुम्ही राजकारणात येणार का? असा प्रश्‍न विचारला असता मोदी म्हणाले, देशभरातील 5 लाख 29 हजार 230 दुकानदार हीच माझ्यासाठी संसद आहे ते पुरेसे असल्याचे सांगत त्यांनी हा प्रश्‍न उडवून लावला. वेरूळ मठाचे मठाधिपती महामंडलेश्‍वर शांतीगिरी महाराज यांची आपण सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आर्शिवाद घेतल्याचेही प्रल्हाद मोदी यांनी यावेळी सांगितले.

या आहेत मागण्या...
राज्यभरातील सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळावे, केरोसीनचे बंद करण्यात आलेले नियतन पुर्ववत सुरू करावे, देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना तीनशे रुपये प्रति क्विंटल किंवा चाळीस हजार रुपये मानधन देण्यात यावे, स्वस्त धान्य वितरण ऑनलाईन यंत्रणेत वारंवार अडथळा निर्माण होत असल्यामुळे ऑनलाईनचे काम तातडीने पुर्ण करून घ्यावे, शासकीय धान्य गोदामातून द्वारपोच धान्य वितरण योजनेअंतर्गत पुर्ण वजनाचे धान्य कोणतीही हमाली न घेता स्वस्त धान्य दुकानदारांना पोहचवावे, दुकानाचे भाडे नियमित मिळावे, अकुशल कामगार (मापारी) यांना दरमहा 8 हजार रुपये मानधन द्यावे आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 

संबंधित लेख