काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात; रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचा आरोप

''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली. जीएसटीचे निर्णय घेताना आतमध्ये एक आाणि बाहेर दुसरी अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसने घेतल्याने व्यापार्यांना याचा लाभ मिळू शकला नाही,'' अशी टीका केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली.
काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात;  रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचा आरोप

पुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली. जीएसटीचे निर्णय घेताना आतमध्ये एक आाणि बाहेर दुसरी अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसने घेतल्याने व्यापार्यांना याचा लाभ मिळू शकला नाही,'' अशी टीका केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली.  

महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ व्यापार्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी गोयल यांनी संवाद साधला. राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक बाळा ओसवाल, प्रविण चोरबोले, नगरसेविका कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, शर्मिला ओसवाल, दीपक मिसाळ, अजय भोसले यावेळी उपस्थित होते.  

गोयल म्हणाले, "गतीने बदल होत असताना त्याचे त्रासाचे चटके सहन करावे लागतात, पण हे बदल देश व नागरिकांच्या हितासाठी आहेत याचा विचार करावा. ज्या व्यापार्यांच्या आजच्या समस्या आहेत त्या  या पाच वर्षातल्या नसून पुर्वीपासूनच्या आहेत. जीएसटी कायदा, बँकिंग व्यवस्थेत बदल, आॅनलाईन कर भरण्याची पद्धत या सुधारणा झाल्याने भ्रष्टाचार कमी झाला.  'सब कुछ चलता है' ही मानसिकता  बदलण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गरीबी वाढवण्यात केवळ काँग्रेस राष्ट्रवादीचा हात आहे. त्यांना गरीबी हटवायचीच नसल्याने अनेक वर्षांपासून केवळ गरीबी हटावचा नारा देत आहेत,"  

देशाच्या विकासात व्यापार्यांचे योगदान योगदान मोठे आहे, देशाचा विकास झाल्यास त्याचा सर्वात जास्त फायदा ही तुम्हालाच होईल. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी व्यापार्यांनी भाजपला पाठिंबा द्यावा असे आवाहन गोयल यांनी केले.  
व्यापाऱ्यांकडे चोर म्हणून बघण्याची आमची व्रुत्ती नाही. तुम्ही समाजाला पुढे नेणारी चाके आहात.  भाजप सरकारने जीएसटी आणला असली तरी त्यात बदल केले जातील. व्यापार्यांसाठी मुक्त वातावरण निर्माण केले आहे. पारदर्शक, सुस्पष्ट धोरण केले आहे, असे बापट यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com