Pimri chinchwad - NCP hits out at BJP mla Laxman Jagtap | Sarkarnama

भाजपने आपल्या पदाधिकाऱ्यांचा गुन्हेगारी इतिहास तपासावा -संजोग वाघेरे-पाटील 

उत्तम कुटे  : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 जुलै 2017

पिंपरी : " भाजपचेच पिंपरी-चिंचवडमधील अनेक पदाधिकारी जेलवारी करून आले असून पालिका निवडणुकीत "मोका'तील गुन्हेगारांनाही त्यांनी उमेदवारी दिली होती.   भाजपने आपल्या या गुन्हेगारी पदाधिकाऱ्यांचा इतिहास तपासावा '',असे आव्हान
राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना दिले आहे . 

पिंपरी : " भाजपचेच पिंपरी-चिंचवडमधील अनेक पदाधिकारी जेलवारी करून आले असून पालिका निवडणुकीत "मोका'तील गुन्हेगारांनाही त्यांनी उमेदवारी दिली होती.   भाजपने आपल्या या गुन्हेगारी पदाधिकाऱ्यांचा इतिहास तपासावा '',असे आव्हान
राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना दिले आहे . 

आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका करताना श्री. वाघेरे पाटील म्हणाले , "  राष्ट्रवादीला कोणाच्या खांद्यावरून राजकारण करण्याची गरज नाही. उलट राजकीय कटकारस्थान करण्यात भाजप पदाधिकाऱ्यांचाच हातखंडा आहे. तसेच आमच्या पोटापाण्याची काळजीही त्यांनी करू नये. पैसे खाण्यासाठी हपापलेल्या सत्ताधारी भाजपला वेळोवेळी प्रखर विरोध केला जाईल .''

पालिकेतील ठेकेदारांची दोनशे कोटीची थकीत बिले देण्यासाठी सत्ताधारीभाजपचे पदाधिकारी तीन टक्के कमिशन मागत असल्याच्या तक्रारीवर पंतप्रधान कार्यालयाने चौकशीचा आदेश दिला आहे. त्यामुळे त्यात सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सोमवारी (ता.3) राष्ट्रवादीतर्फे वाघेरे-पाटील यांनी केली होती.

तर, ही तक्रार देण्यासाठी प्रमोद साठे या "मोका'तील गुन्हेगाराला राष्ट्रवादीने पुढे केल्याचा  प्रतिहल्ला भाजपने काल (ता.4) केला होता. त्याला वाघेरे यांनी पत्रक काढून आज प्रतिउत्तर दिले. 

पिंपरी चिंचवड महापालिकेत  भाजप शहराध्यक्ष् लक्ष्मण जगताप, स्थायी समिती अध्यक्ष सिमा सावळे, व भाजप सरचिटणीस सारंग कामतेकर हे खुले आम ३ टक्केंची
बिले थकलेल्या ठेकेदारांकडून मागणी करत आहेत अशी  स्पष्टपणे तक्रार आहे. ही तक्रार देण्यासाठी पक्षाने कुणालाही प्रवृत्त केले नसल्याचे श्री. वाघेरे पाटील यांनी  स्पष्ट केले.

ते म्हणाले, "साठे यांच्या जिवाला त्यांनी तक्रार दिल्याने धोका संभवत असल्याने त्यांना संरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती. त्यावरून पक्षाचा सबंध गुन्हेगारांशी  असल्याचे म्हणणे हा भाजपचा जावईशोध आहे .  सीमा सावळे तक्रारदाराची चौकशी करायला लावून एक प्रकारे सर्व सामान्यनागरिकाला धमकी देत आहेत. "

श्री. वाघेरे पाटील  म्हणतात,""स्थायी समितीच्या आडून कोट्यवधींची माया गोळा करताना स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे व भाजपचे शहर सरचिटणीस सारंग  कामतेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अडथळा ठरतो आहे .  भाजपचे शहराध्यक्ष आणि  आमदार लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीत असताना त्यांना चुकीची कामे दिली नाही का? का आता त्यांना व पदाधिकाऱ्यांना पैसे खायला विरोध होत असताना तो सहन होत नाही म्हणून ते बिथरले आहेत. त्यातून ते राष्ट्रवादीवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत.मोदींच्या नावामुळे  मिळालेल्या सत्तेतून त्यांना मस्ती आली आहे. खरेतर  या प्रकाराने महापालिकेची देशभर बदनामी झाली आहे .  भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप स्थायी समिती अध्यक्ष- सिमा सावळे आणि भाजप पदाधिकारी सारंग कामतेकर यांच्यावर महानगरपालिका आयुक्तांनी शहराची बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करावा . " 

 

          

संबंधित लेख