बहूमत असूनही भाजपकडून पिंपरी-चिंचवडला व्हिप 

बहूमत असूनही भाजपकडून पिंपरी-चिंचवडला व्हिप 

पिंपरी ः भाजपचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत बहुमत आहे.128 सदस्य असलेल्या पालिकेत या पक्षाचे 77 सदस्य आहेत. तरीही 4 ऑगस्टला होऊ घातलेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपने आज व्हिप जारी केला. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे. महापौर पदासाठी उमेदवारी देताना भाजपमधील दोन गट नाराज झाल्याने ही खबरदारी घेण्यात आल्याचे समजते. 

प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रावादीचे संख्याबळ पाहता तो दुबळा असूनही त्यांनी महापौर व उपमहापौरपद निवडणुक लढविण्याचे ठरविले आहे. परिणामी ही निवडणूक अपेक्षेनुसार बिनविरोध होणार नाही. त्यामुळेच बहूमत असूनही भाजपला हा व्हिप काढावा लागला आहे. आपले एकही मत फूटू नये याची खबरदारीही यातून सत्ताधार्यांनी घेतली आहे. कुणी,जर विरोधी मतदान केले, त्याचे सदस्यत्व या व्हिपमुळे सत्ताधाऱ्यांना रद्द करता येणार आहे. त्यामुळेच सभागृहनेते एकनाथ पवार यांनी आज तो जारी केला आहे. 

महापौरपदासाठी सत्ताधारी शहर भाजपमधील मूळ एकनिष्ठ भाजपाई गट प्रबळ दावेदार होता. त्याजोडीने भाजपचे शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप गटाने भोसरी विधानसभा मतदारसंघात असलेले हे पद आपल्याकडे घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरु होते.

अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हा गट नुकताच भेटून आला होता.मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.ही उमेदावारी भाजपचे सहयोगी सदस्य आणि भोसरीचे आमदार यांचे समर्थक राहूल जाधव यांना देण्यात आली. परिणामी जुन्या भाजपाई गटाबरोबर चिंचवडचा भाऊ गटही नाराज झाला व आहे. त्याचा फटका महापौर व उपमहापौर निवडीत बसू नये म्हणून व्हिप जारी करण्याची सावधगिरी सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com