उद्धव ठाकरे यांची 22 ऑक्टोबरला राजगुरुनगरला जाहीर सभा 

दसरा मेळाव्यानंतर (ता.18) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा शिरूर (जि.पुणे) लोकसभा मतदारसंघात राजगुरुनगर येथे 22 तारखेला होत आहे. लोकसभा प्रचाराचीच ही सभा ठरणार असल्याने ती जंगी करण्याचे नियोजन शिवसेनेकडून सध्या सुरु आहे. शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचाराचा नारळ या सभेने फुटणार आहे.
उद्धव ठाकरे यांची 22 ऑक्टोबरला राजगुरुनगरला जाहीर सभा 

पिंपरीः दसरा मेळाव्यानंतर (ता.18) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा शिरूर (जि.पुणे) लोकसभा मतदारसंघात राजगुरुनगर येथे 22 तारखेला होत आहे. लोकसभा प्रचाराचीच ही सभा ठरणार असल्याने ती जंगी करण्याचे नियोजन शिवसेनेकडून सध्या सुरु आहे. शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचाराचा नारळ या सभेने फुटणार आहे.

केदारेश्वर, खेड येथील भीमा नदीवरील पुलाचे उदघाटन आणि एसटी स्थानकातील हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, सुखदेव आणि भगतसिंग यांचे पुतळे असलेल्या स्मारकाचे अनावरण ठाकरे खेड दौऱ्यात करणार आहेत. पूर्वी फक्त राजगुरुंचाच पुतळा राजगुरुनगरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर होता. आता तो थोडा मागे सरकून तेथे सुखदेव आणि भगतसिंग यांचेही पुतळे आता बसविण्यात आले आहे. पन्नास लाख रुपये खर्चून हे स्मारक तयार करण्यात आले आहे. तर, खेडच्या भीमा नदीवरील एकमेव ब्रिटीशकालीन व आयुष्य संपलेल्या पुलाला समांतर असा पूल केदारेश्वर बंधाऱ्याजवळ बांधण्यात आला आहे. त्यामुळे खेडमधील वाहतूक कोंडी हलकी होणार असून वाहनचालकांची सोय होणार आहे. या दोन उदघाटनानंतर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठाकरे यांची सभा होईल, असे खेडचे शिवसेना आमदार सुरेश गोरे यांनी `सरकारनामा'ला सांगितले.

शिरूरमधून आढळराव यांच्या लोकसभा उमेदवारीची अधिकृत घोषणाच काय ती होण्याचे बाकी आहे. त्यामुळे ते निवडणूक तयारीला लागले आहेत.पक्ष सदस्य नोंदणी तसेच गावभेट दौरे त्यांचे सुरु झाले आहेत. 22 ची ठाकरेंची सभा ही आढळराव यांची प्रचारसभाच होईल, असे पक्षातूनच सांगण्यात आहे. त्यामुळे तिच्या तयारीसाठी खुद्द खासदार आढळराव,आमदार गोरे,जिल्हाप्रमुख राम गावडे, खेड तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर व इतर पदाधिकाऱ्यांची काल (ता.11) राजगुरुनगर येथे बैठक झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com