मावळप्रमाणे शिरूरमध्ये आता शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख; आक्रमक सुलभा उबाळेंकडे जबाबदारी

मावळनंतर आता शिरूरमध्येही स्थानिक खासदारांचे कट्टर समर्थक असलेल्या त्यांच्या समर्थकांना महत्वाची पदे देण्यास पक्षाने सुरवात केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढणे त्यांना अधिक सोपे जाणार आहे. शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या खंद्या पाठीराख्या आणि पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना महिला आघाडी संघटिका (महिलाप्रमुख) सुलभा उबाळे यांचे प्रमोशन करण्यात आले आहे. त्यांना आता महिला आघाडी जिल्हा संघटिका (भोसरी,खेड,शिरूर) हे नवे पद देण्यात आले आहे.
मावळप्रमाणे शिरूरमध्ये आता शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख; आक्रमक सुलभा उबाळेंकडे जबाबदारी

पिंपरीः मावळनंतर आता शिरूरमध्येही स्थानिक खासदारांचे कट्टर समर्थक असलेल्या त्यांच्या समर्थकांना महत्वाची पदे देण्यास पक्षाने सुरवात केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढणे त्यांना अधिक सोपे जाणार आहे. शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या खंद्या पाठीराख्या आणि पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना महिला आघाडी संघटिका (महिलाप्रमुख) सुलभा उबाळे यांचे प्रमोशन करण्यात आले आहे. त्यांना आता महिला आघाडी जिल्हा संघटिका (भोसरी,खेड,शिरूर) हे नवे पद देण्यात आले आहे. 

उबाळे यांच्या प्रमोशनमुळे आढळराव यांची टीम आणखी मजबूत झाली आहे. शिवसेनेत निष्ठावंताना न्याय दिला जातो,हे या निवडीतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. 

दरम्यान, मावळनंतर आता शिरूरमध्येही दोन जिल्हाप्रमुख झाले आहेत. दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरालाही आता एकाऐवजी दोन महिला शहर संघटिका तथा महिला शहरप्रमुख मिळाल्या आहेत. उबाळे या पूर्वी शहर संघटिका होत्या. त्याऐवजी आता दोघींकडे लोकसभा मतदारसंघनिहाय ही जबाबदारी देण्यात आली आहे. वेदश्री काळे यांच्याकडे भोसरी,तर अॅड उर्मिला काळभोर यांच्याकडे पिंपरी आणि चिंचवड सोपविण्यात आले आहे. त्यानंतर आता याच धर्तीवर दोन शहरप्रमुख देण्याची मागणी पुढे आली आहे. सध्या योगेश बाबर हे शहरप्रमुख आहेत. भोसरीसाठी आढळरावांचे खंदे समर्थक धनजंय आल्हाट यांना शहरप्रमुख करून त्यांच्याकडे भोसरीची जबाबदारी देण्याची मागणी केली गेली आहे. ती सुद्धा मान्य होईल, अशी चिन्हे आहेत. या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जोडीने भोसरी मतदारसंघातील विभागप्रमुख, उपविभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या करून आढळराव यांनी आघाडी घेतली आहे. या नियुक्यांवर सुद्धा उबाळे आणि पर्यायाने आढळरावांचीच छाप आहे.

शिरूरमधून दादांचा खासदारकीचा चौकार,तर पुन्हा मारणारच शिवाय खेड, शिरूर आणि भोसरीमध्येही शिवसेनेचे आमदार कसे होतील,हे माझे लक्ष्य राहणार असल्याची प्रतिक्रिया उबाळे यांनी या नियुक्तीवर सरकारनामाला दिली. पक्षप्रमुखांना अपेक्षित महिला आघाडीची बांधणी करणार असल्याचे त्या म्हणाल्या. पुणे विभागाचे संपर्कप्रमुख आणि शिवसेनानेते संजय राऊत यांनी उबाळे यांचे या निवडीनंतर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com