pimpri-srirang-barane-railway-mega-recruitment | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

आता रेल्वेमधील मेगा भरती स्थगितीची मागणी : खासदार बारणे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

आरक्षणासाठी लढा सुरु केलेल्या मराठा समाजाने राज्य सरकारची मेगा भरती स्थगित करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. तशीच मागणी आता रेल्वेच्या मेगा भरतीबाबतही करण्यात आली आहे. ही भरती नेमकी क्रांतीदिनी असल्याने ती मागेपुढे करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. 

पिंपरीः आरक्षणासाठी लढा सुरु केलेल्या मराठा समाजाने राज्य सरकारची मेगा भरती स्थगित करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. तशीच मागणी आता रेल्वेच्या मेगा भरतीबाबतही करण्यात आली आहे. ही भरती नेमकी क्रांतीदिनी असल्याने ती मागेपुढे करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. 

क्रांतीदिनापासूनच आरक्षणासाठी मराठा मोर्चाने राज्यभरातील आंदोलनाची दाहकता वाढविण्याचे ठरविले असून राज्य बंद करण्यात येणार आहे. त्याचा फटका या भरतीसाठी जाणाऱ्या मराठी तरुणांनाच बसणार असल्याने ही मागणी करण्यात आली आहे. 

अगोदरच केंद्र सरकारच्या सेवेत व त्यातही रेल्वेसारख्या खात्यात मराठी टक्का कमी आहे. दुसरीकडे राज्यात बेरोजगारी दिवसागणिक वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने आपली मेगा भरती काढली आहे. मात्र,ती नेमकी क्रांतिदिनी 9 ऑगस्टला ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तिची तारीख बदलण्याची मागणी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे आज केली. या मागणीचे निवेदन त्यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले. त्यावर मुंबईकर असलेले रेल्वेमंत्री काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

ही भरती मागे,पुढे केली नाही,तर राज्यातील तरुण त्यापासून वंचित राहणार आहे. जेणेकरून रेल्वेतील मराठी टक्का आणखी घसरण्याची भीती आहे.

यासंदर्भात बारणे म्हणाले, की या भरतीसाठी सर्व महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून उमेदवारांना भरतीसाठी केंद्रावर जावे लागणार आहे. परंतु या दिवसापासून मराठा मोर्चाच्या आयोजकांनी संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचे ठरविले आहे. यामुळे अनेक युवक व युवतींना या मेगा भरतीच्या ठिकाणी जाता येणे शक्य होणार नाही. मराठा मोर्चाचे मोठ्या प्रमाणात आयोजन असल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचीत घटना घडु नये म्हणुन या मेगा भरतीची दि. ८ ऑगस्ट किंवा १० ऑगस्ट रोजी घेण्याची मागणी केली आहे.
 

संबंधित लेख