पिंपरी-चिंचवड शिवसेनाभवनात अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली 

दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना पिंपरी-चिंचवडच्या शिवसेना भवनात आज सकाळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शिवसेनाभवनात अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली 

पिंपरीः दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना पिंपरी-चिंचवडच्या शिवसेना भवनात आज सकाळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. 

एकीकडे राज्यभर शिवसेना ही भाजपवर तुटून पडली असताना या घटनेतून, शिवसेनेची अटजलींप्रतीची अटल श्रद्धा,मात्र स्पष्ट झाली. यावेळी शहरातील प्रत्येक प्रभागात महिला शाखा करण्याचा मनोदय शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. दरम्यान, शहराच्या वतीने सायंकाळी सर्वपक्षीय सभेत अटलजींना आदरांजली अर्पण करण्यात आली. 

सूर्यवंशी या आज शहरात आल्या होत्या. त्यावेळी आकुर्डीतील शिवसेना भवनात त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तत्पूर्वी अटलजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर त्यांनी शहर महिला आघाडीच्या कामाचा आढावा घेतला. आघाडीतील उर्वरित पदे लवकर जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. शहरातील प्रत्येक प्रभागात महिला आघाडीची शाखा असावी, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

शहर महिला आघाडीच्या वतीने शहर संघटिका सुलभा उबाळे यांनी सूर्यवंशी यांचा सत्कार केला. या प्रसंगी जिल्हा संघटिका सुशीला पवार, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, मीनल यादव, रेखा दर्शिले तसेच वैशाली मराठे,स्वरूपा खापेकर,शशिकला उभे,स्मिता जगदाळे,अशा भालेकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com