पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षकांचाच घेणार क्‍लास

आपल्या शाळांचा दर्जा सावरण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आता त्यांचे ऑडिट करणार असून शिक्षकांचेच क्‍लास घेणार आहे. दिल्ली महापालिकेच्या शाळा पाहिल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला असल्याचे महापौर राहुल जाधव व सर्व गटनेत्यांनी शुक्रवारी सांगितले. मात्र, शाळांचा घसरलेला पट व दर्जा सावरून त्या स्मार्ट करण्याकरिता काही वर्षे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षकांचाच घेणार क्‍लास

पिंपरीः आपल्या शाळांचा दर्जा सावरण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आता त्यांचे ऑडिट करणार असून शिक्षकांचेच क्‍लास घेणार आहे. दिल्ली महापालिकेच्या शाळा पाहिल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला असल्याचे महापौर राहुल जाधव व सर्व गटनेत्यांनी शुक्रवारी सांगितले. मात्र, शाळांचा घसरलेला पट व दर्जा सावरून त्या स्मार्ट करण्याकरिता काही वर्षे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नुकतेच पालिकेचे शिष्टमंडळ दिल्लीतील स्मार्ट डिजिटल शाळा पाहून आले. त्या पाहून ते प्रभावित झाल्याचे दिसले. विशेषतः तेथील स्वच्छता आणि मुलांसाठी असलेले स्वीमिंग पूल व डिजिटल बोर्ड त्यांना भावले. त्यातही तेथील शिक्षकांची झोकून काम करण्याची वृत्ती भावली, असे महापौर जाधव, सभागृहनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी सांगितले. आपल्या व दिल्ली पालिकांच्या मूलभूत सुविधांच्या बाबतीत साम्य असले,तरी तेथील शिक्षकांच्या डेडिकेशनमुळे त्या शाळा स्मार्ट झाल्या आहेत, असे ते म्हणाले. 

आपल्या शिक्षकांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांना दिल्लीतील शाळेत पंधरा दिवसांसाठी पाठविले जाणार असून तेथील शिक्षकही आपल्या शाळेत येतील, असे महापौर म्हणाले. तर, शाळांचा दर्जा सुधारण्याकरिता "क्वॉलिटी कंट्रोल ऑफ इंडिया'कडून शाळांचे ऑडिट करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.तर, पालिकेत शिकणाऱ्या गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पालिका, जर प्रयत्न करणार असेल, त्याला विरोधकांची हीसाथ असेल, असे साने, कलाटे आणि चिखले यांनी स्पष्ट केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com