pimpri-raosaheb-danve | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

भाजपची हवा आहे, फक्त आपला टायर पंक्‍चर नाही हे पहा : दानवे 

उत्तम कुटे 
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

सध्या भाजपची हवा आहे. फक्त कार्यकर्त्यांनी आपली सायकल पंक्‍चर नाही, हे पाहिले, तर ती नक्की दिल्लीला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी आपल्या स्टाइलमध्ये सांगितले. 

पिंपरीः नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यासाठी कुणा भविष्यवेत्याचीही गरज नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार हे मोदीच असतील, हे पुन्हा एकवार स्पष्ट केले. सध्या भाजपची हवा आहे. फक्त कार्यकर्त्यांनी आपली सायकल पंक्‍चर नाही, हे थूक लावून पाहिले, तर ती नक्की दिल्लीला जाईल, असेही त्यांनी आपल्या स्टाइलमध्ये सांगितले. 

पुणे जिल्ह्यातील शिरूर मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पक्ष आढावा बैठकीत ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी दोन्ही कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचा समाचार घेतला. 

दानवे म्हणाले,""दोन्ही कॉंग्रेसने यात्रा काढल्या. पण त्यांना अद्याप आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवता आलेला नाही. त्यामुळेच मायावती त्यांच्यापासून दुरावल्या आहेत.आम्ही, मात्र आमचा पीएम ठरविला आहे. ते नरेंद्र मोदी आहेत. त्यांना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांना आपले काम चांद्यापासून बांद्यापर्यंत वाढवावे लागणार आहे. त्यात सध्या भाजपची हवा आहे. फक्त कार्यकर्त्यांनी आपली सायकल पंक्‍चर होऊ द्यायची नाही,ही काळजी घेतली पाहिजे. ती पंक्‍चर नाही ना हे थूक लावून तपासले पाहिजे. तसे केले,तर सायकल नक्की दिल्लीला जाईल. आघाडी सरकारांचा अनुभव चांगला नसल्याने जनता कॉंग्रेससह विरोधी पक्षांना मान्यता देणार नाही. त्यांनी खोडा घालण्याचेच काम केले आहे. पीएम आणि सीएम महाराष्ट्र उभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातही विरोधक खोडा घालीत आहेत. मात्र, तो फेल गेला.त्यामुळे आता ते एकत्र आले आहेत. त्यातून आपल्या माणसाचे (पंतप्रधान) काम चांगले आहे, हे स्पष्ट होत आहे. 
पूर्वी भाजपच्या कार्यक्रमाला ग्रामीण भागात एक सरपंच येत नव्हता.आता, मात्र पक्षाची 21 राज्यात सत्ता आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष हे ही आपलेच आहे.'' 
 

संबंधित लेख