अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे पिंपरी पालिकेचे अधिकारी मेटाकुटीस 

एखाद्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्त पदभार असला, तर त्याची अवस्था दोन दगडावर पाय ठेवल्यासारखी होते. त्यातून त्याला दोन्हीही पदांना पूर्ण न्याय देता येत नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत, तर तब्बल 35 अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांची दररोज मोठी धावपळ उडत आहे. तसेच प्रभारी पदाचा भार हा मूळ पदाच्या ठिकाणाहून दूर असल्याने या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचा विपरीत परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे.
अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे पिंपरी पालिकेचे अधिकारी मेटाकुटीस 

पिंपरी : एखाद्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्त पदभार असला, तर त्याची अवस्था दोन दगडावर पाय ठेवल्यासारखी होते. त्यातून त्याला दोन्हीही पदांना पूर्ण न्याय देता येत नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत, तर तब्बल 35 अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांची दररोज मोठी धावपळ उडत आहे. तसेच प्रभारी पदाचा भार हा मूळ पदाच्या ठिकाणाहून दूर असल्याने या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचा विपरीत परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे. 

अतिरिक्त भाराने पिंपरी पालिकेचे अधिकारी पार वाकून गेले आहेत. त्यामुळे त्यांना झोकून देऊन काम करण्यात अडथळा येत आहे. एका अधिकाऱ्याकडे, तर तब्बल सहा अतिरिक्त पदभार आहेत. त्यामुळे त्यांची दररोजच मोठी धावपळ होत आहे. तसेच प्रभारी पदाचा भार हा मूळ पदाच्या ठिकाणाहून दूर असल्याने या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

पालिकेच्या बहुतांश विभागप्रमुखांकडे त्यांच्या मूळ पदापेक्षा इतरही पदभार असल्याने पालिकेचे संपूर्ण प्रशासनच प्रभारी झाले आहे. पालिकेचा गाडाही हेच अतिरिक्त पदभार असलेले अधिकारी हाकत आहेत. अधिकारी कमी व विभाग (खाती) जास्त यामुळे ही स्थिती झाल्याचे पालिकेच्या प्रशासन विभागातून सांगण्यात आले. या विभागाचे प्रमुख असलेले डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे त्यांच्या प्रशासन या मूळ जबाबदारीच्या जोडीने जनसंपर्क आणि स्थानिक संस्था कर (एलबीटी) ही सुद्धा जबाबदारी आहे. 

अतिरिक्त अतिरिक्त पदभार असलेल्यांत वर्ग एकचे बहुतांश (वीस) अधिकारी आहेत. पालिका आयुक्तानंतर अतिरिक्त आयुक्तांचे पद दोन नंबरचे आहे. या पदावरील अधिकाऱ्याची बदली झाली आहे. तेथे शासनाने नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे ते रिक्तआहे.या पदाची अतिरिक्त जबाबदारी सहाय्यक आयुक्त (मध्यवर्ती भांडार) प्रवीण आष्टीकर यांच्याकडे देण्यात आलेली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे नागरवस्ती व विकास योजना,निवडणूक (आधार व जनजणनासह), अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन हे पाच उपविभागही आहेत. इतर चार सहाय्यक आयुक्तांपैकी दोघांकडे दोन, तर दोघांकडे एकेक अतिरिक्त पदाचा प्रभार आहे. 

पिंपरी पालिकेत उपायुक्तपद नाही. त्यामुळे इतर पालिकांत उपायुक्त दर्जा असलेले अधिकारी येथे सहाय्यक आयुक्त पदावर असतात. अतिरिक्त आयुक्त (करसंकलन) दिलीप गावडे यांच्याकडे अभिलेख आणि स्वच्छ भारतचा प्रभारी कारभारही आहे. तीन उपशहर अभियंत्यांकडे अतिरिक्त जबाबदारी आहे. दहा कार्यकारी अभियंते आपली मूळ पद सांभाळून दुसरीकडेही प्रभारी आहेत. त्यातील सातजणांकडे दोन अतिरिक्त पदभार आहेत. 

पालिकेचे मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्याकडे नागरी सुविधा हा सुद्धा पदभार आहे.चार उपअभियंतेही दुहेरी आघाडीवर आहेत.पाच लेखाधिकारी आणि प्रशासन अधिकारीही अशीच दुहेरी कसरत करीत आहेत.अशाप्रकारे एकूणच पिंपरी पालिकेचा कारभार हा प्रभारी अधिकारीच सध्या सांभाळीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com