निवडणूक तयारीनंतर `राष्ट्रवादी'ची आता उमेदवार चाचपणी

निवडणूक तयारीच्या आढावा बैठकांनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता उमेदवार चाचपणीलाही सुरवात केली आहे. त्यासाठी येत्या 6 व 7 तारखेला राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. त्यातून लोकसभा निवडणूक ही कदाचित या वर्षअखेरीस होण्याचे संकेत मिळत आहेत.
निवडणूक तयारीनंतर `राष्ट्रवादी'ची आता उमेदवार चाचपणी

पिंपरीः निवडणूक तयारीच्या आढावा बैठकांनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता उमेदवार चाचपणीलाही सुरवात केली आहे. त्यासाठी येत्या 6 व 7 तारखेला राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. त्यातून लोकसभा निवडणूक ही कदाचित या वर्षअखेरीस होण्याचे संकेत मिळत आहेत.

पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहराची आढावा बैठक दोन दिवसांपूर्वीच (ता.1) अजित पवार यांनी घेतली. त्यात बूथ रचनेसह निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर लगेचच शिरूर व मावळची ही दुसरी बैठक होत आहे. त्यात उमेदवारीविषयी चर्चा व चाचपणी होणार असल्याचे या बैठकीचे आमंत्रण असलेल्या एक पदाधिकाऱ्याने `सरकारनामा'ला आज सांगितले. 

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांचे नाव मावळसाठी कालच (ता.2) पुढे आले आहे. त्यामुळे त्यांना ती मिळते की दुसऱ्या नावावर शिक्कामोर्तब होते, हे 6 तारखेलाच कळणार आहे. तर, मावळमधून जसे पार्थ यांचे नाव पुढे येऊन मतदारसंघातच नव्हे, तर संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवारांत खळबळ उडाली. तसेच शिरूरमधूनही असे नाव पुढे येते का हे सुद्धा 6 तारखेलाच कळणार आहे. कारण त्याच दिवशी मावळनंतर लगेचच शिरूरची अशी बैठक होणार आहे.

या दोन दिवसांच्या बैठक सत्राची सुरवात पुणे जिल्ह्यापासून होणार आहे. जिल्ह्यातील मावळची बैठक सकाळी पावणेअकरा वाजता आहे. नंतर शिरूर व टप्याटप्याने इतर मतदारसंघाच्या त्या होणार आहेत. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकणार आहेत. आघाडी जवळपास नक्की होणार असल्याने कॉंग्रेस व इतर पक्षांना सोडावयाच्या जागांबाबतही यावेळी खल होणार आहे. त्याची मदत नंतर मित्रपक्षाबरोबर जागावाटपासाठी होणार आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com