pimpri-ncp-made-pimpale-saudagar-smart-bjp-mayor | Sarkarnama

`राष्ट्रवादी'च्या काळातच पिंपरी स्मार्ट; भाजप महापौरांची अप्रत्यक्ष कबुली 

उत्तम कुटे 
रविवार, 26 ऑगस्ट 2018

``पिंपरी चिंचवडचा "स्मार्ट सिटी'त समावेश होण्यापूर्वीच शहराच्या पिंपळे सौदागर भागात आल्यावर नवी मुंबईत प्रवेश केल्याचा भास होत असे. एवढा विकास येथे झालेला आहे,'' असे सांगताना भाजपचे महापौर राहूल जाधव यांनी हा भाग पूर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काळातच स्मार्ट झाल्याची अप्रत्यक्ष कबुली आज दिली.

पिंपरीः ``पिंपरी चिंचवडचा "स्मार्ट सिटी'त समावेश होण्यापूर्वीच शहराच्या पिंपळे सौदागर भागात आल्यावर नवी मुंबईत प्रवेश केल्याचा भास होत असे. एवढा विकास येथे झालेला आहे,'' असे सांगताना भाजपचे महापौर राहूल जाधव यांनी हा भाग पूर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काळातच स्मार्ट झाल्याची अप्रत्यक्ष कबुली आज दिली. भाजपचे स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या (त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक) पाठपुराव्यामुळेच हा भाग स्मार्ट झाल्याचेही महापौरांनी आवर्जुन सागितले. 

स्मार्टसिटी प्रकल्पात समावेश झाल्यानंतर पिंपळे सौदागर येथील सायकल शेअरिंग या पायल प्रोजेक्‍टचे उद्‌घाटन केल्यानंतर महापौर बोलत होते. महापौरांसह जगताप, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृहनेते एकनाथ पवार, स्थानिक नगरसेवक नाना काटे आदींनी सायकल चालवून या प्रोजेक्‍टचे उदघाटन केले. यावेळी महापौर बोलत होते. "स्मार्ट सिटी'तील सुरु झालेला शहरातील हा पहिलाच प्रकल्प आहे. मात्र, ही सार्वजनिक सायकल सुविधा गेल्यावर्षीच 23 नोव्हेंबरला मी सुरु केली होती, असा दावा राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक नाना काटे यांनी केला आहे. फक्त नाव बदलून रेडीमेट योजना म्हणून ती पुन्हा नाव बदलून सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

पिंपळे सौदागर अगोदरच स्मार्ट असल्याचे महापौरांचे वक्तव्य खरे असल्याचेही काटे यांनी "सरकारनामा'शी बोलताना आज सांगितले. ते म्हणाले, की 2007 पासूनच्या माझ्या प्रयत्नातून हा भाग अगोदरच स्मार्ट झालेला आहे. आमच्या राजवटीतच हा भागच नव्हे, तर संपूर्ण शहर स्मार्ट झालेले आहे. येथील सोसायट्यांत यापूर्वीच राबविलेले स्वच्छतेचे प्रकल्प स्वच्छ भारत योजनेत पुन्हा घेतले गेले आहेत. एवढेच नाही,हा भाग अगोदरच स्मार्ट असल्याने यो स्मार्ट सिटी प्रकल्पात एरिया बेस डेव्हलपमेंट म्हणून घ्यायला नको होता. त्याऐवजी दुसरा भाग घेतला असता, तर तो स्मार्ट,तरी झाला असता. मात्र, "स्मार्ट सिटी'त हा भाग स्मार्ट केला असे दाखवायला सोपे जावे म्हणून अगोदरच स्मार्ट असलेला हा रेडिमेड भाग निवडण्यात आला आहे.'' 
 

 
 

संबंधित लेख