आपल्या गटनेत्याचा समावेश असलेल्या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक कलाटे यांची टीका 

दौरे करण्यापेक्षा शहराला अत्यावश्‍यक नागरी सुविधा पुरवा,असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका पदाधिकाऱ्यांच्या दिल्ली दौऱ्यावर आज केला.
आपल्या गटनेत्याचा समावेश असलेल्या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक कलाटे यांची टीका 

पिंपरीः दौरे करण्यापेक्षा शहराला अत्यावश्‍यक नागरी सुविधा पुरवा,असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका पदाधिकाऱ्यांच्या दिल्ली दौऱ्यावर आज केला. आजपासूनच तो सुरू झाला आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे राष्ट्रवादीचे गटनेते तथा पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि पक्षाचे आणखी एक नगरसेवकही (श्‍याम लांडे)या दौऱ्यात सहभागी झालेले आहेत. 

महापौर राहुल जाधव, सभागृहनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते शिक्षण समिती सभापती,सदस्य व इतर नगरसेवक, शिक्षणाधिकारी आदी काल आप सरकारच्या दिल्लीतील शाळा आणि दवाखाने पाहण्यासाठी विमानाने गेले आहेत. दोन दिवसांचा हा दौरा आहे. शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. कचरा उचलला जात नसून त्याचे ढीग साचलेले आहेत. पावसाळ्यात पाणीटंचाई आहे. ते विकत घ्यावे लागत आहे. वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. साथीच्या रोगांनी थैमान घातलेले आहे. त्यावर औषधे उपलब्ध नाहीत हे प्रश्‍न सोडविण्याऐवजी असे दौरे काढून काय फायदा होणार आहे, अशी लेखी विचारणा कलाटे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आज केली. ]

गतवर्षी नदी सुधार आणि बीआरटीसाठी असाच गुजरातचा (अहमदाबाद) जंबो दौरा (अंदाजे शंभर) झाला होता. त्याचा फायदा होण्याऐवजी उलट त्यानंतर शहरातील नद्यांची अवस्था आणखी वाईट झाली असून तीच स्थिती बीआरटीचीही झाल्याकडे कलाटे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. दिल्ली दौऱ्याचेही फलित यापूर्वीच्या इतर दौऱ्यासारखेच होणार असल्याचे भाकीत त्यांनी केले आहे. पालिकेच्या देश,परदेश दौऱ्यांची फलनिष्पत्ती शून्य असताना पुन्हा असा दौरा काढल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com