pimpri-maratha-reservation-ghantanad | Sarkarnama

पिंपरीतील खासदार, आमदारांच्या बंगल्याबाहेर मराठा मोर्चाचा घंटानाद

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मराठा मोर्चाच्या वतीने आज पिंपरी-चिंचवडमधील दोन खासदार आणि तीन आमदारांच्या बंगल्याबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तर, शिरूरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर ते केले गेले. यावेळी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व या पक्षाचे सहयोगी आमदार महेश लांडगे हे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. त्यांनी त्यांचे निवदेन स्वीकारले. आपण समाजाबरोबर असून आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

पिंपरीः मराठा मोर्चाच्या वतीने आज पिंपरी-चिंचवडमधील दोन खासदार आणि तीन आमदारांच्या बंगल्याबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तर, शिरूरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर ते केले गेले. यावेळी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व या पक्षाचे सहयोगी आमदार महेश लांडगे हे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. त्यांनी त्यांचे निवदेन स्वीकारले. आपण समाजाबरोबर असून आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

आमदार,खासदार जागे व्हा, य़ासह एक मराठा,लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे अशा घोषणा घंटानाद करून आंदोलक देत होते. यावेळी सर्व खासदार,आमदारांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने आढळराव यांच्यासह मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे राज्यसभा सदस्य अमर साबळे हे दिल्लीत आहेत. त्यामुळे ते घरी वा कार्यालयात नव्हते. त्यामुळे त्यांचे आप्त आणि पीएंकडे आंदोलनकर्त्यांनी आरक्षणासह इतर मागण्यांचे नि ;वेदन दिले. त्यात कोपर्डी घटनेतील आरोपींना तातडीने फाशी, मराठा विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी सवलतीची अंमलबजावणी आदी मागण्या आहेत.

सकाळी नऊ वाजता साबळे यांच्या निवासस्थानापासून हे घंटानाद आंदोलन सुरु झाले. नंतर, ते बारणे, चाबूकस्वार,जगताप, लांडगे यांच्या बंगल्याबाहेर,तर आढळरावांच्या कार्यालयासमोर ते करण्यात आले. 
शिवसेनेचे आमदार अॅड.गौतम चाबूकस्वार हे घरी नव्हते. त्यामुळे त्यांचे पीए विजय जगताप यांनी आमदारांच्या वतीने आंदोलकांकडून निवेदन घेतले. 
 

संबंधित लेख