pimpri-gautam-chabukswar-birthday  | Sarkarnama

आमदार चाबूकस्वारांच्या वाढदिवशी शिवसेना, भाजपची झाली `अशी' युती

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

शिवसेना आणि भाजपमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये लढाई सुरू असली, तरी तिचा मागमूस शिवसेनेचे पिंपरीचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसाला (ता.30) दिसला नाही. तेथे,मात्र या दोन्ही पक्षांची मनसे युती झालेली दिसून आली. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला. त्यात चाबुकस्वार सहसा कुणाशीही शत्रुत्व घेत नसल्याने इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे अभीष्टचिंतन केले. 

पिंपरीः शिवसेना आणि भाजपमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये लढाई सुरू असली, तरी तिचा मागमूस शिवसेनेचे पिंपरीचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसाला (ता.30) दिसला नाही. तेथे,मात्र या दोन्ही पक्षांची मनसे युती झालेली दिसून आली. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला. त्यात चाबुकस्वार सहसा कुणाशीही शत्रुत्व घेत नसल्याने इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे अभीष्टचिंतन केले. 

दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर मुष्टियुद्धात चमकदार कामगिरी केलेल्या आ. चाबूकस्वारांतील खेळाडूने आपल्या वाढदिवशी पाच लाख रुपयांची कुस्तीची मॅट एका मंडळाला भेट दिली. या शिवसेना आमदाराच्या वाढदिवसानिमित्त मिलिंदनगर येथील मशिदीत मुस्लिम वधू,वर मेळावा घेण्यात आला. वाढदिवसानिमित्त फुगेवाडी येथील जयमहाराष्ट्र मित्र मंडळाला चाबूकस्वारांनी पाच लाख रुपये किमतीची कुस्ती मॅट भेट दिली. कष्टकऱ्यांचे नेत्रतपासणी शिबिर घेऊन त्यांना चष्मे वाटण्यात आले. गरीब विद्यार्थ्यांना दहा हजार वह्या देण्यात आल्या. अनाथ आश्रमात अन्नदान करण्यात आले. 

खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे व इतर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आपल्या आमदारांना शुभेच्छा दिल्याच. शिवाय भाजपचे सहयोगी सदस्य आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, आझम पानसरे, माजी महापौर व माजी शहराध्यक्ष योगेश बहल, कॉंग्रेसचे कैलास कदम, नरेंद्र बनसोडे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही चाबूकस्वारांचे अभीष्टचिंतन केले. 
 

 
 

संबंधित लेख