pimpri-ganesh-festival-BJP | Sarkarnama

सत्ताधारी भाजपचे नगरसेवक वर्गणी काढून देणार गणेश मंडळांना बक्षीस 

उत्तम कुटे 
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

पिंपरीः सरकारी खर्चाने धार्मिक उत्सव बंदीच्या न्यायालयीन आदेशावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने शक्कल लढविली आहे. पालिकेच्या गेल्यावर्षीच्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे या आदेशामुळे रखडलेले बक्षीस वितरण आता सत्ताधारी भाजपचे नगरसेवक वर्गणी काढून करणार आहेत. दरम्यान, रोख बक्षीस असलेली व अंदाजे 25 वर्षांपासूनची ही स्पर्धा यावेळी बंद पडल्याने गणेश मंडळाचा काहीसा हिरमोड झाला आहे. 

पिंपरी पालिका दरवर्षी गणेशोत्सव सजावट स्पर्धेवर दरवर्षी पाच लाख रुपये खर्च करीत होती. गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा यावर्षी न्यायालयीन आदेशामुळे प्रथमच खंडित झाली आहे. गेल्यावर्षी ती व्यवस्थित झाली. त्यानंतर न्यायालयाचा हा आदेश आला. त्यामुळे पालिकेच्या खर्चातून बक्षीस दिले,तर न्यायालयाचा अवमान होईल,या भीतीने स्पर्धेचे बक्षीस वितरण रखडले. पुढील वर्षाच्या गणेशोत्सवापूर्वी एक महिना अगोदर गतवर्षाच्या स्पर्धेची बक्षिसे समारंभपूर्वक दिली जात होती. त्याला व्यत्यय यावेळी आला. गत स्पर्धेची बक्षिसे यावेळी गणेशोत्सव सुरू होऊनही दिली गेलेली नाहीत. त्यामुळे पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी काल (ता.17) पालिकेसमोर ढोल बजाओ आंदोलन केले. त्यानंतर महापौरांनी ही बक्षिसे येत्या शुक्रवारी (ता.21) दिली जाणार असल्याचे लेखी जाहीर केले. मात्र, रोख बक्षीस कसे देणार याविषयी महापौरांकडे विचारणा केली असता पालिका खर्चातून ती दिली जाणार नसून या खर्चाचा भार भाजप नगरसेवक उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा भंग व अवमान होणार नाही, असे ते म्हणाले. 

तत्पूर्वी दरवर्षी आषाढी वारीत दिंड्यांना भेटवस्तू देण्याचीही पालिकेची गेल्या कित्येक वर्षाची परंपरा आहे. ती न्यायालयाच्या या आदेशामुळे यावर्षी मोडीत निघते की काय अशी शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपले महिन्याचे मानधन त्यासाठी दिले. त्यामुळे अंदाजे वीस लाख रुपयांतून दिंड्यांना यावेळी भेटवस्तू (ताडपत्री) देता येणे शक्‍य झाले. मात्र, पुढीलवर्षी ते जमेल की नाही,याविषयी शंका आहे. कारण यावर्षीची गणेशोत्सव देखावा स्पर्धा पालिकेने गुंडाळल्याने या शंकेला खतपाणी मिळाले आहे. 

संबंधित लेख