pimpri-finance-commission-inspects-PCMC-SCADA-project | Sarkarnama

वित्त आयोगाच्या सदस्यांनी घेतली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या `स्क्वॉडा'ची माहिती 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पिंपरीः पंधराव्या वित्त आयोगाच्या सदस्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्काडा (सुपरवायझरी कंट्रोल ऍन्ड डाटा ऍक्विझिशन) पाणीपुरवठा प्रकल्पाची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती घेतली. मेट्रो प्रकल्पाचीही त्यांनी माहिती घेऊन आढावा घेतला. 

पालिकेच्या निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात ही प्रणाली आहे. तिला पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य शक्तिकांता दास, डॉ.अशोक लहेरी, डॉ.अनुप सिंग यांनी भेट दिली.त्यांचे स्वागत महापौर राहुल जाधव यांनी केले.

राज्याच्या वित्त विभागाचे प्रधान सचिव राज गोपाल देवरा, आयोगाचे सचिव अरविंद मेहता, सहसचिव डॉ. रवी कोटा, अर्थविषयक सल्लागार टॉय सायरीक, सहायक संचालक प्रवीण जैन, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यावेळी उपस्थित होते. 

स्क्वॉडा पाणीपुरवठा प्रकल्पाचे तसेच गेल्या दहा वर्षातील महापालिका क्षेत्राच्या विकासाचा दर तसेच आगामी काळातील महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहितीचे सादरीकरण हर्डीकर यांनी केले. पुणे मेट्रोच्या आढाव्याचे सादरीकरण पुणे मेट्रो प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे यांनी केले. यावेळी सदस्यांच्या हस्ते जल शुद्धीकरण केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. 

स्काडा यंत्रणेमुळे एकाच ठिकाणी शहरातील सर्व पाण्याच्या टाक्‍यांची पातळी, पाण्याचा प्रवाह व त्याचा वेग याची माहिती मिळते आहे. पाणीपुरवठा यंत्रणेत दोष निर्माण झाला, तरी तो तेथेच समजतो. त्यामुळे त्याचे निराकरणही लगेच करता येणे शक्‍य होते, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी "सरकारनामा'ला सांगितले.

पाणी व्यवस्थेवर देखरेख करणाऱ्या या सिस्टीममुळे ठरविल्यानुसार पाणीपुरवठा होतो की नाही याचीही खातरजमा होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख