पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेतेपद एका विधानसभा इच्छुकाकडून दुसऱ्याकडे

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते दत्ता साने यांना ठरल्यानुसार बदलले जाणार आहे. त्यांचा राजीनामा घेण्यास अजित पवार यांनी शहराध्यक्षांना सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीला नवा गटनेता व पालिकेला नवा विरोधी पक्षनेता मिळणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांचे नाव घेतले जात आहे.
पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेतेपद एका विधानसभा इच्छुकाकडून दुसऱ्याकडे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते दत्ता साने यांना ठरल्यानुसार बदलले जाणार आहे. त्यांचा राजीनामा घेण्यास अजित पवार यांनी शहराध्यक्षांना सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीला नवा गटनेता व पालिकेला नवा विरोधी पक्षनेता मिळणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांचे नाव घेतले जात आहे.

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे साने हे आगामी विधानसभेला भोसरी मतदारसंघातून प्रबळ दावेदार आहेत. तर काटे यांचे नाव चिंचवडमधून त्यासाठी चर्चेत आहे. त्यामुळे गटनेता तथा विरोधी पक्षनेतेपद हे एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात जाणार आहे. त्याचा फायदा आमदारकीच्या तयारीसाठी सबंधिताना काही प्रमाणात होईल, असा राजकीय जाणकाराचा अंदाज आहे.

एकेका वर्षासाठी गटनेता बदलण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतलेला आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी योगेश बहल यांनी हे पद भूषविले. मात्र,ते काहीच प्रभाव पाडू शकले नाहीत. दुसऱ्या वर्षीची साने यांची कारकिर्द मात्र गाजली. त्यांनी सत्ताधारी भाजप व प्रशासनालाही सळो की पळो करून सोडले.त्यांची मुदत गेल्या महिन्यात 17 तारखेला संपली. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्या, असे दादांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे -पाटील यांना फोन करून सांगितले आहे. त्याला वाघेरे यांनी दुजोरा दिला. नेत्यांच्या सांगण्यानुसार साने यांना निरोप दिल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे सत्ताधारी व प्रशासनाच्या नाकी दम आणणारे साने यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत बदलू नये, अशी त्यांच्या हितचिंतकांची मागणी आहे. मात्र, त्याचा कितपत विचार होईल,याबाबत शंका आहे. साने यांनी मात्र आपल्याला अजून दादांचा फोन आला नसल्याचे 'सरकारनामा'ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com