Pimpri corporation : Landhe and Jagtap groups at loggerheads | Sarkarnama

पिंपरी पालिकेत लांडगे गटाला जगताप गटाचा शह

उत्तम कुटे
शनिवार, 17 जून 2017

मुत्सदी अध्यक्ष आणि सरळ महापौर

बुधवारी (ता.14)स्थायीच्या बैठकीत ड्रेसकोडच्या विषयाला मंजूरी देण्यात आली.त्याच्या बातम्या दुसऱ्या दिवशी आल्या. हे पाहून असा विषयच नसल्याचे सांगत महापौरांनी त्या देणाऱ्या पत्रकारांनाच लक्ष्य केले. यावेळी सावळे उपस्थित होत्या. आपले गुपित उघड होताच त्यांनी मुत्सदेगिरी दाखवित असा विषयच झाला नसल्याचे सांगत त्यावेळी वेळ मारून नेली.मात्र,नंतर पत्रकारांनी स्थायीचे मिनिटस महापौरांसमोर हजर केले आणि आपल्याला डावलले गेल्याची त्यांची खात्री झाली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपमधील दोन गटांतील सत्तासंघर्ष आणि सुप्त गटबाजी तीन महिन्यांतच समोर आली आहे.

राज्यात प्रथमच नगरसेवकांना ड्रेसकोड,तर अधिकाऱ्यांना ब्लेझर देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महावपालिकेने घेतला आहे.मात्र, एवढ्या मोठ्या निर्णंयाबाबत भाजपने आपल्या महापौरांनाच अंधारात ठेवल्याचे दिसून आले.

 पक्षाचे शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक असलेल्या सीमा सावळे अध्यक्ष असलेल्या पालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या ड्रेसकोड या विषयाची भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे खंदे पाठीराखे असलेल्या महापौर नितीन काळजे यांना माहितीच नव्हती.

ती त्यांनी काल (ता.16) पत्रकारांसमोर जाहीर करताच सत्ताधाऱ्यांतील गटबाजी आणि श्रेयबाजीही समोर आली.यामुळे पक्षातील जुना,नवा गट व त्यांच्यातील वाद मागे पडला असून नव्या गटातच (राष्ट्रवादीतून आलेले) तो सुरु झाला आहे.  

भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे लांडगे (एनसीपी)व जगताप हे बिनीचे शिलेदार फोडून प्रथमच आपली सत्ता आणली. पण त्याबरोबर पक्षात नवी गटबाजीही आली. पूर्वी मुंडे,गडकरी गट होते.त्याची जागा आता नवा (लांडगे,जगताप)आणि जुना (मुंडे,गडकरी समर्थक तसेच खासदार अमर साबळे असे एकनिष्ठ) अशा दोन गटांनी घेतली.

त्यातही एनसीपीचे नेते अजित पवार हे सत्ता पालिकेतील सत्ता गेल्याने शहराचे दादा राहिले नसल्याने ते बनण्यावरून भाजपचे दादा (लांडगे)आहेणि भाऊ (जगताप) यांच्यात सुप्त संघर्ष सुरु झाला.

त्याचे पडसाद पालिका पदाधिकारी निवडीतही उमटले.त्यात जगताप गटाने मारीत पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायीचे अध्यक्षपद तसेच सभागृहनेतेपद आपल्याकडे खेचले.तर,लांडगे गटाला महापौर या शोभेच्या अकार्यकारी पदावर समाधान मानावे लागले. 

त्यामुळे लांडगे गट अस्वस्थ आहे. त्यात जगताप गटाकडून डावलले जात असल्याने त्यांची बैचेनी आणखी वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येक घडामोड वा नवी योजना आपल्याला प्रथम कळली पाहिजे आणि ती आपणच जाहीर करणार, असे फर्मान महापौरांना काढावे लागले होते.मात्र, त्याची दखलच घत्रण्यात आली नसल्याचे ड्रेसकोडच्या विषयावरून सिद्ध झाले आहे.

 

संबंधित लेख