पिंपरीत `खासदार दादा आणि आमदार दादा' यांच्यात पुन्हा जुंपली 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रस्ते कामातील कथित नव्वद कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावरून शिवसेनेचे दादा (शहराचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील) यांनी भाजपच्या दादांना (भोसरीचे आमदार महेश लांडगे) यांना काल (ता.13) पुन्हा डिवचले. त्यामुळे या दोन दादांत पुन्हा संघर्ष होऊ घातला आहे. त्याला आमदार दादांनी कालच त्वेषाने प्रतिउत्तर देत या नव्या लढाईला पुन्हा तोंड फोडले आहे.
पिंपरीत `खासदार दादा आणि आमदार दादा' यांच्यात पुन्हा जुंपली 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रस्ते कामातील कथित नव्वद कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावरून शिवसेनेचे दादा (शहराचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील) यांनी भाजपच्या दादांना (भोसरीचे आमदार महेश लांडगे) यांना काल (ता.13) पुन्हा डिवचले. त्यामुळे या दोन दादांत पुन्हा संघर्ष होऊ घातला आहे. त्याला आमदार दादांनी कालच त्वेषाने प्रतिउत्तर देत या नव्या लढाईला पुन्हा तोंड फोडले आहे. 

पिंपरी पालिकेच्या सव्वाचारशे कोटी रुपयांच्या रस्तेकामात नव्वद कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्याला भाजपच्या इतर पदाधिकारी व लोकप्रतिनिधींबरोबर लांडगे हे सुद्धा जबाबदार असल्याचा आरोप आढळराव यांनी सूचकपणे पत्रकारपरिषदेत काल केला होता. हे बहुतांश रस्ते "भोसरी'तील आहेत. त्यामुळे भोसरीचे प्रतिनिधित्व करणारे खासदार दादा आणि आमदार दादांत पुन्हा त्यावरून श्रेयाची लढाई सुरू झाली. ते आगामी लोकसभेचे शिवसेना व भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत. त्याची तयारी म्हणून मतदारांचे लक्ष वेधण्याचे काम दोन्ही दादांनी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. 

प्रथम मतदारसंघात अतिशय आवडीच्या अशा बैलगाडा शर्यतीवरून या दोन दादांत प्रथम श्रेयाची लढाई सुरू झाली. न्यायालयाने बंदी घातलेली ही शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी आपणच कसे प्रयत्नशील आहोत, हे त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न दोघांनीही केला. हा वाद शमतो न शमतो तोच शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरून या दोन दादांत पुन्हा श्रेयाचे राजकारण रंगले. सध्या चारपदरी असलेल्या या मार्गाच्या सहापदरीकरणास आपणच चार वर्षे पाठपुरावा करून मंजुरी मिळविल्याचा दावा आढळराव यांनी केला. तो लांडगे यांनी खोडून काढला. हा वाद निवळल्यानंतर आता या दोन दादांत पालिकेच्या कामातील भ्रष्टाचारावरून जुंपली आहे. समाविष्ट गावात भाजपने विकासकामांचा धडाका सुरू केल्याने आढळरावांचा पोटशूळ उठल्याचा प्रतिहल्ला लांडगे यांनी चढविला. "भोसरी'तील समाविष्ट गावात वीस वर्षानंतर प्रथमच रस्ते होत असल्याने आपली मते जाणार या भीतीने आढळराव बिथरले असल्याचा टोलाही लांडगेंनी कालच लगावला. 

खासदार व आमदार असलेले आढळराव व लांडगे हे आपापल्या पक्षात दादा म्हणूनच ओळखले जातात. कार्यकर्ते त्यांना साहेबऐवजी प्रेमाने "दादा'च म्हणतात. आढळराव 2014 ला तिसऱ्यांदा, तर लांडगे हे त्याचवर्षी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांच्यात पहिली ठिणगी पडली. आढळरावांना लोकसभेला त्यांच्या शिरूर या मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्‍य भोसरी विधानसभा मतदारसंघाने दिले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेला नगरसेवक असलेले लांडगे आमदार झाले. त्यांनी गेल्यावर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत भोसरीत शिवसेनेचा सुपडा साफ केला आणि तेथेच या दोन दादांतील संघर्षाची बीजे रोवली गेली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com