pimpri-chinchwad-shivsena-bjp-claim | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

शिवसेनेकडील मावळसह शिरुर मतदारसंघावरही भाजपचा क्लेम

उत्तम कुटे
शनिवार, 9 मार्च 2019

मावळवरील क्लेम कायम ठेवताना आता तो भाजपने शिरुरवरही केला आहे. एवढेच नाही तर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात अर्ज भरेपर्यंत तो कायम राहणार असल्याचेही आज स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे युती होऊनसुद्धा या दोन पक्षांतील बेबनाव शहरात कायम असल्याचे दिसून आले आहे. हा तिढा सोडवण्यासाठी आता पालकमंत्रीच बैठक घेणार आहेत.

पिंपरी : मावळवरील क्लेम कायम ठेवताना आता तो भाजपने शिरुरवरही केला आहे. एवढेच नाही तर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात अर्ज भरेपर्यंत तो कायम राहणार असल्याचेही आज स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे युती होऊनसुद्धा या दोन पक्षांतील बेबनाव शहरात कायम असल्याचे दिसून आले आहे. हा तिढा सोडवण्यासाठी आता पालकमंत्रीच बैठक घेणार आहेत.

एक हजार चौरस फूटापर्यंतच्या घरांना राज्य सरकारने शास्ती कर आपल्या मागणीवरुन माफ केल्याचा दावा शहर कारभारी व भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन आज केला. त्यावेळी त्यांनी मावळवर पक्षाने केलेला दावा कायमच असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर शिरुरमध्येही फॉर्म भरेपर्यंत तो राहणार असल्याचे ते म्हणाले. शिरूरमधील इच्छुक आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यावेळी उपस्थित होते.

वरील दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत. एवढेच नाही तर तेथे त्यांचेच खासदार आहेत. तेच पुन्हा संभाव्य उमेदवार आहेत.मात्र, मावळातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला भाजपने नुसता जाहीर विरोधच केला नसून या मतदारसंघावर दावाही ठोकला आहे. त्यामुळे तेथील पेच वाढला आहे.

दरम्यान, शिरुरमधून खासदारकीचा चौकार मारण्याच्या तयारीत असलेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी टाळीसाठी हात पुढे करूनही आमदार लांडगे व भाजपने त्यांना आठ दिवसांनंतरही अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. त्याबाबत आमदार लांडगे यांना विचारले असता याबाबत पालकमंत्री गिरीश बापट याप्रश्नी बैठक घेणार असल्याचे त्यांनी `सरकारनामा'ला सांगितले.
 

संबंधित लेख