pimpri-chinchwad-sangram-tawade-congress-sevadal | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडच्या संग्राम तावडे यांची सेवादलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पिंपरी-चिंचवड कॉंग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष आणि प्रांतिक सदस्य संग्राम तावडे यांची सेवादलाच्या राष्ट्रीय सहसचीवपदी आज नियुक्ती झाली. 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड कॉंग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष आणि प्रांतिक सदस्य संग्राम तावडे यांची सेवादलाच्या राष्ट्रीय सहसचीवपदी आज नियुक्ती झाली. 

सेवादलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळविणारे पुणे जिल्ह्यातील ते पहिले कॉंग्रेस कार्यकर्ते आहेत. आता त्यांची एखाद्या राज्यात सेवादल प्रभारी म्हणून नियुक्ती होईल. दरम्यान,या निवडीतून त्यातून कॉंग्रेसच्या नव्या तरुण अध्यक्षांचे (राहूल गांधी) जुन्या,एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्त्यांवर लक्ष असल्याचे दिसून आले आहे. 

सेवादल ही कॉंग्रेसची महत्वाची आघाडी संघटना आहे. पक्षबांधणीसह पुर्नबांधणीहीचे कामही ती करीत आहे. शुभ्र पॅन्ट, शर्ट आणि गांधीटोपी असा सेवादलाचा गणवेश आहे. पक्ष जनतेपर्यंत पोचवून त्यात शिस्त राखण्याच्या कामावर आपला भर राहणार असल्याची प्रतिक्रिया तावडे यांनी या नियुक्तीनंतर `सरकारनामा'ला दिली. या निवडीबद्दल कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष सचीन साठे यांनी तावडे यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा्ही दिल्या आहेत.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी पन्नासजणांची सेवादलाची कार्यकारिणी आज जाहीर केली. त्यात तावडे यांच्यासह शशीकांत थोरात (सचीव), चंद्रकांत दायमा, के.के.पांडे (दोघेही सल्लागार), विनोद कोळपकर, राकेश शेट्टी (दोघेही सहसचीव) अशा पाचजणांचा समावेश आहे. या जंबो कार्यकारिणीत चार सरचिटणीस, एक खजिनदार, 28 सचीव, 12 सहसचीव आणि पाच सल्लागार आहेत. ललितभाई देसाई (गुजरात) हे सेवादलाचे मुख्य संघटक (अध्यक्ष) आहेत. त्यांच्या व साठे यांच्या शिफारशीवरून जुने एकनिष्ठ तावडे यांना यापदी संधी दिली गेली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख