pimpri-chinchwad-police-commissionarate-workforce-problem | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरु झाले, पण मनुष्यबळाचे काय?

उत्तम कुटे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पिंपरीः स्वातंत्र्यदिनी सुरु झालेल्या पिंपरी-चिंचवड या नव्या पोलिस आयुक्तालयात पहिला गुन्हा हा विनयभंगाचा नोंद झाला आहे. त्यामुळे आयुक्तालयाची सुरवात ही महिला अत्याचार गुन्ह्याने झाली असून ती धोक्याची घंटा वाजविणारी आहे. 

पिंपरीः स्वातंत्र्यदिनी सुरु झालेल्या पिंपरी-चिंचवड या नव्या पोलिस आयुक्तालयात पहिला गुन्हा हा विनयभंगाचा नोंद झाला आहे. त्यामुळे आयुक्तालयाची सुरवात ही महिला अत्याचार गुन्ह्याने झाली असून ती धोक्याची घंटा वाजविणारी आहे. 

दरम्यान, अपुऱ्या मनुष्यबळाआभावी पोलिस आयुक्तालयाचे कामकाज परिणामकारकरित्या पूर्ण क्षमतेने सुरु झालेले नाही. तोच मोठा अडसर ठरला आहे. त्यामुळे सोयीसुविधाविना ते सुरु करण्याची घाई झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी ते होऊन तूर्त त्याचा हवा तसा फायदा शहरवासियांना होताना दिसत नाही. त्यामुळे आयुक्तालयासाठी पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता मनुष्यबळासाठी तो करावा, अशी मागणी शहरवासियांतून पुढे आली आहे. 

पहिल्याच दिवशी नव्या पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला 18 कॉल आले. त्यातील पहिला हा दापोडी येथील अपघाताचा होता. त्यामुळे आयुक्तालयाला सलामी अपघाताच्या कॉलने मिळाली. तर, पहिल्या गुन्ह्याची नोंदही विनयभंगासारख्या महिलाविषयक गंभीर गुन्ह्याने झाली. 

तात्पुरत्या भाड्याच्या जागेत पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (मुख्यालय व गुन्हे) कार्यालय आणि नियंत्रण कक्ष सुरु झाला असले,तरी पुरेसे मनुष्यबळ आणि जागेअभावी आयुक्तालयाचे अनेक विभाग सुरु झालेले नाहीत. त्यामुळे आयुक्तालय सुरु झाले असले,तरी  पिंपरी-चिंचवडकर आय़ुक्तालयाच्या फायद्यापासून तसे वंचितच आहेत. निम्मेही मनुष्यबळ मिळालेले नाही. मिळाले ते पुणे पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीणमधून वर्ग झालेले आहेत. 

आयुक्तालय आस्थापनेवर नवी भरती झालेली नाही. त्यामुळे आयुक्तालयाला पूर्ण क्षमतेने काम करण्यात अडथळा आलेला आहे. एकेका अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक पदभार देण्यात आलेले आहे.

पहिल्या दिवशी मोठा द्राविडी प्राणायम करीत सहाय्यक आयुक्ताची (जनसंपर्क) प्रभारी जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने आयुक्तालय उदघाटनाची प्रेसनोट काढली. मात्र, दुसऱ्या दिवशीचे पोलिस बुलेटिन मनुष्यबळाची त्यासाठी नेमणूकच न झाल्याने नव्या आयुक्तलयाला जारी करण्यात अपयश आले. ते पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होताच काढणे सुरु होईल, असे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांनी सांगितले. 

दुसरीकडे पिंपरीसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्याने प्रसिद्धीमाध्यमांना पिंपरी-चिंचवडमधील गुन्ह्यांची माहिती देणे (पोलिस बुलेटिन) पुणे पोलिस आयुक्तालयाने दोन दिवसांपासून बंद केले आहे. त्यामुळे माध्यमांची गैरसोय सुरु आहे. परिणामी शहरवासियांना  याबाबत माहिती मिळण्यास तूर्त काहीशी अडचण आलेली आहे.

संबंधित लेख