pimpri-chinchwad-new-mayors-initiatives | Sarkarnama

स्वागताप्रित्यर्थ पुष्पगुच्छ स्वीकारण्यास पिंपरी-चिंचवडच्या नव्या महापौरांचा नकार 

उत्तम कुटे 
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पिंपरीः श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी आपल्या स्वागताचा नवा आदर्शवत असा पायंडा पाडला आहे. स्वागताप्रित्यर्थ हारतुऱ्यांऐवजी पुस्तके,वह्या असे शालोपयोगी साहित्य स्वीकारण्याचे त्यांनी ठरविले आहे. त्यामुळे उद्यापासून पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याचे त्यांनी आज सरकारनामाशी बोलताना सांगितले.किमान महिनाभर,तरी त्यांचा हा सत्कार सोहळा सुरू राहण्याची शक्‍यता आहे. 

पुष्पगुच्छ काही तासातच खराब होतात. तसेच त्यावर खर्चही होतो.त्यामुळे त्याऐवजी ज्ञानदानास हातभार लावणारी पुस्तके सत्कारादाखल स्वीकारण्याचे ठरविले असल्याचे महापौर जाधव म्हणाले. हा उपक्रम त्यांनी आज जाहीर केला. परिणामी त्याची आज भेटीसाठी येणाऱ्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी आणलेले गुच्छ महापौरांनी स्वीकारले. मात्र, उद्यापासून ते घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्कारादाखल मिळणारे शालोपयोगी साहित्य गरजू मुलांना वाटणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुच्छाऐवजी दिली जाणारी पुस्तके अनुरूप मुलांना दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.त्यामुळे ज्ञानदानास हातभार लागेल, तसेच वाचनाची आवड टिकून राहण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. 

शनिवारी (ता.4) जाधव हे महापौरपदी निवडून आले. त्यांचा पालिकेतील आज पहिलाच दिवस होता. त्यामुळे सत्कार व स्वागतासाठी मोठी झुंबड उडाली. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके देऊन सत्कार करण्याचे आवाहन केले.त्याची लगेच अंमलबजावणी मावळत्या उपमहापौर शैलजा मोरे यांनी केली. त्यांनी नव्या महापौरांचा पुस्तक देऊन सत्कार केला. 

दरम्यान, नव्या महापौरांनी आणखी पालिकेतील आपल्या कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी दुपारी तीन ते पाच ही वेळ राखीव ठेवली आहे. या वेळेत ते फक्त अभ्यागतांच्या भेटी घेणार आहेत. शहरवासीयांच्या अडीअडचणी या भेटीतून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याव्दारे उपाययोजनाही ते करणार आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख