pimpri-chinchwad-mayor-rahul-jadhav-takes-blessings-of-raj-thakare | Sarkarnama

पिंपरीच्या महापौरांनी आपले पूर्वाश्रमीचे नेते राज ठाकरे यांच्या पाया पडून घेतले आशीर्वाद 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपवर कडाडून टीका करत असताना, पिंपरी चिंचवडमधील भाजपचे नवनिर्वाचित महापौर आणि पूर्वाश्रमीचे मनसैनिक राहूल जाधव यांचे,मात्र राज ठाकरेंवरील प्रेम आज व्यक्त झालं. शहराचे प्रथम नागरिक असलेले जाधव चक्क राज ठाकरेंसमोर नतमस्तक झाले. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला.

पिंपरीः मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपवर कडाडून टीका करत असताना, पिंपरी चिंचवडमधील भाजपचे नवनिर्वाचित महापौर आणि पूर्वाश्रमीचे मनसैनिक राहूल जाधव यांचे,मात्र राज ठाकरेंवरील प्रेम आज व्यक्त झालं. शहराचे प्रथम नागरिक असलेले जाधव चक्क राज ठाकरेंसमोर नतमस्तक झाले. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला.

ठाकरे पिंपरी चिंचवडमधील एका जिमचं उदघाटन करण्यासाठी आले होते. त्यांचा हा काही मिनिटांचा हा धावता दौरा होता. उदघाटन करून भाषण न करताच ते निघून गेले. त्यामुळे मोठ्या आशेने जमलेल्या मनसैनिकांचा हिरमोड झाला. यावेळी राहुल जाधव यांनी राज ठाकरेंच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. ठाकरे यांनी देखील महापौर जाधव यांना पुढील कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या. तसेच जेव्हा-जेव्हा मदत लागेल. त्यावेळी भेटायला या असेही ठाकरे यांनी जाधव यांना सांगितले.

ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली, तेव्हा  राहुल जाधव यांनी मनसेमध्ये प्रवेश करुन राजकारणात एन्ट्री केली होती. मनसेच्या तिकिटावर ते 2012 साली पिंपरी महापालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच निवडून आले होते. 2017 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नुकतेच ते महापौर झाले. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेच्या एकमेव नगरसेवकाने जाधव यांनाच मत दिलं होतं. तर, उपमहापौर निवडणुकीत हे नगरसेवक मतदानापासून अलिप्त राहिले होते. महापौर निवडीनंतर राज ठाकरे यांनी प्रथम नगरसेवकपदाची संधी दिल्यामुळेच मी आज महापौर झाल्याची प्रांजळ कबुली जाधव यांनी दिली होती.

संबंधित लेख