pimpri-chinchwad-mayor-rahul-jadhav-new-develoment-mantra | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडच्या नव्या महापौरांचा विकासाचा मंत्र 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

सर्वांना सोबत घेऊन ऐतिहासिक आठवण राहील, असे कामकाज करणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

पिंपरीः सर्वांना सोबत घेऊन ऐतिहासिक आठवण राहील, असे कामकाज करणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

महापौर जाधव म्हणाले, की शहराचा सर्वांगीण विकास करताना तळागाळातील नागरिकापर्यंत पालिकेच्या योजना पोचविण्याचे काम करणार आहे. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. तळागाळातील नागरिकापर्यंत विकास पोहचविणार असून शहराचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. 

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका यांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख