पिंपरी महापालिकेचे महापौर -स्थायी समिती अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी महिनाभरात बदलणार

पिंपरीः फेब्रुवारी आणि मार्च महिना पिंपरी पालिकेत मोठ्या राजकीय उलथापालथीचा ठरणार आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते,स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्वाच्या चारही पदावरील व्यक्ती बदलल्या जाणार आहेत.त्यातही पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समिती अध्यक्षांकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
pcmc-jagtap-landge
pcmc-jagtap-landge

पिंपरीः  फेब्रुवारी आणि मार्च महिना पिंपरी पालिकेत मोठ्या राजकीय उलथापालथीचा ठरणार आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते,स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्वाच्या चारही पदावरील व्यक्ती बदलल्या जाणार आहेत.त्यातही पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समिती अध्यक्षांकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

वर्षभरापूर्वी भाजप पिंपरीत प्रथमच सत्तेत आली.त्यांचे 77 नगरसेवक निवडून आले.प्रत्येकाला पद देण्यासाठी त्यांनी प्रमुख पदाचा कालावधी आता एक वर्षाचाच केला आहे.

त्यामुळे उपमहापौर,महापौर ही अडीच वर्षांनी बदलली जाणारी पदे यावेळी वर्षातच बदलण्यात येणार आहेत. तर,सभागृह नेतेपदही त्याला अपवाद न करण्याचे ठरले आहे.स्थायी अध्यक्ष,तर दरवर्षीच बदलला जातो.

मात्र,तेथील सदस्यांचा दोन वर्षाचा कालावधीही भाजपने आपल्या सदस्यांसाठी एक वर्षाचाच केला आहे. त्यामुळे त्यांचे दहा आणि चिठ्ठीव्दारे बाहेर पडलेले राष्ट्रवादीचे दोन असे स्थायीचे 16 पैकी 12 सदस्य उद्याच्या पालिका सभेत नव्याने निवडले जाणार आहेत.त्यामुळे पालिका खजिन्याची चावी असलेल्या पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीची पुर्नरचना होणार आहे.

समिती अध्यक्षपद रोटेशनुसार आता आमदार महेश लांडगे गटाकडे येणार आहे. परिणामी अध्यक्षपदाचा निवाडा निकालात निघाला आहे.त्यामुळे सदस्य म्हणून वर्णी लागावी याकरिता नगरसेवकांनी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे. भाजपने आपल्या दहा सदस्यांचे राजीनामे घेतले आहेत.

त्यामुळे तेथे त्यांचे नवे सदस्य येतील. राष्ट्रवादीचे दोघांची मुदत संपली आहे. तेथे तब्बल दहापट अधिक नगरसेवकांनी अर्ज दिले आहेत. भाजपच्या दहा जागांसाठी सहापट म्हणजे साठ सदस्य इच्छूक आहेत. मात्र, दोन्ही पक्षांचे नेते स्थायीवर कुणाची वर्णी उद्या लावतात,याकडे साऱ्या शहराचे लक्ष लागले आहे.

सध्याच्या स्थायी अध्यक्षा सीमा सावळे या भाजपचे आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक आहेत. त्यांची मुदत या महिनाअखेर संपत आहे. त्यामुळे नव्या स्थायीच्या पहिल्या बैठकीत 7 मार्चला नवीन सदस्य आपला अध्यक्ष निवडतील.

तो यावेळी शहरात भाजपची सत्ता आणण्यात जगताप यांच्याबरोबर महत्वाची भुमिका बजावणारे लांडगे यांच्या गटाचा असणार आहे.त्यासाठी दोनदा निवडून आलेले राहूल जाधव या लांडगे समर्थकाचे नाव जवळपास निश्चीत झाले आहे. नवा अध्यक्ष कुणीही येवो त्याची तुलना साळवे यांच्याशी होत राहणार आहे.

महापौर नितीन काळजे हे लांडगे गटाचे आहेत. त्यामुळे स्थायीचा अध्यक्ष त्यांच्या गटाचा झाला,तर महापौर जगताप गटासाठी त्यांना सोडावे लागणार आहे.त्याकरिता शत्रुघ्न काटे यांचे नाव घेतले जात आहे.मात्र, हे पद ओबीसीसाठी राखीव आहे.त्यामुळे खरा ओबीसी म्हणून शीतल शिंदे यांनीही त्यासाठी दावा केल्याचे बोलले जात आहे.

सभागृह नेते एकनाथ पवार आहेत. ते जुने भाजपाई असले,तरी जगताप समर्थक आहेत.त्यामुळे त्यांच्या पदासाठी जुने भाजपाईच असलेले विलास मडिगेरी यांचे नाव चर्चेत आहेत.उप महापौर शैलजा मोरे यांच्याजागी,मात्र, अद्याप कुणाचेही नाव पुढे आलेले नाही.तेथे पुन्हा महिला नगरसेवकाचीच वर्णी लागेल, असा संभव आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com