हद्दवाढीची पिंपरी-चिंचवड महापालिकेची हॅटट्रिक होणार का?

आयटी हब असलेले हिंजवडी आणि संत तुकोबारायांची समाधी असलेले श्री क्षेत्र देहूसह पश्चिम आणि उत्तर दिशेच्या नऊ गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करण्यास पालिका सभेने काल मंजुरी दिली. यामुळे दर दहा वर्षांनी हद्दीलगतची गावे समाविष्ट करून घेण्याची (हद्दवाढीची) ही आगळी 'हॅटट्रिक' होणार आहे. मात्र, या गावांचा समावेश करण्याची पालिकेची मागणी आघाडी सरकारने याअगोदर नामंजूर केलेली आहे. त्यामुळे युतीचे सरकार ते मंजूर करेल का, यावर ही 'हॅटट्रिक' अवलंबून असणार आहे.
हद्दवाढीची पिंपरी-चिंचवड महापालिकेची हॅटट्रिक होणार का?

पिंपरी : आयटी हब असलेले हिंजवडी आणि संत तुकोबारायांची समाधी असलेले श्री क्षेत्र देहूसह पश्चिम आणि उत्तर दिशेच्या नऊ गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करण्यास पालिका सभेने काल मंजुरी दिली. यामुळे दर दहा वर्षांनी हद्दीलगतची गावे समाविष्ट करून घेण्याची (हद्दवाढीची) ही आगळी 'हॅटट्रिक' होणार आहे. मात्र, या गावांचा समावेश करण्याची पालिकेची मागणी आघाडी सरकारने याअगोदर नामंजूर केलेली आहे. त्यामुळे युतीचे सरकार ते मंजूर करेल का, यावर ही 'हॅटट्रिक' अवलंबून असणार आहे.

हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे आणि तीर्थक्षेत्र देहूगाव, विठ्ठलनगर ही नऊ गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने सोमवारी (दि.५) घेतला.त्यामुळे महापालिकेची तिसऱ्यांदा हद्दवाढ होणार आहे. यापूर्वी देखील गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा ठराव झाला होता.मात्र,ग्रामास्थांच्या विरोधामुळे तो बारगळला होता.त्यामुळे राज्य सरकारनेही तो नामंजूर केला होता. त्यानंतरही पालिकेने आज पुन्हा एकदा हा ठराव मंजूर केला. 

आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये ग्रामपंचायत आहे. त्यामुळे तेथे विकासाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे तेथे बकालपणा वाढला आहे. अशीच काहीशी अवस्था श्रीक्षेत्र देहूची आहे. तर, समावेश होऊ घातलेल्या गावांचाही झपाट्यानेही विकास होतो आहे. ती पालिकेत आली,तर त्यांचा सुनियोजीत विकास करता येईल, या उद्देशातून हा ठराव करण्यात आला आहे.

दरम्यान,यापूर्वी 2007 मध्ये,तर त्याअगोदर 1997 मध्ये हद्दीलगतची गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, कर घेऊनही या गावांत अद्याप पुरेशा मुलभूत सोयीसुविधा पोचलेल्या नाहीत. त्यातही चांगले रस्ते,गटारे आणि पुरेसे पाणी यापासून ही गावे वंचित आहेत. त्यामुळे नव्याने समावेश झालेल्या गावांचा तरी पालिका कसा लगेच झपाट्याने विकास करेल, याविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com