pimpri-chinchwad-corporation-GB-postponed | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड महापालिकेची उद्या आणि परवाची आम, स्थायी सभा स्थगित होणार 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 19 ऑगस्ट 2018

भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची उद्या होणारी मासिक सर्वसाधारण सभा तहकूब होणार आहे.

पिंपरीः भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची उद्या होणारी मासिक सर्वसाधारण सभा तहकूब होणार आहे. तसेच परवाची स्थायी समितीची साप्ताहिक सभाही स्थगित होणार आहे. त्याला सत्ताधारी आणि विरोधी बाकावरूनही दुजोरा देण्यात आला. 

या दोन्ही सभांची वेळ दुपारी दोनची आहे. मात्र, त्या स्थगित करण्याबाबत भाजपची काल बैठक झाली. त्याला कसलाही आक्षेप नसल्याचे प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीच्या गोटातूनही सांगण्यात आले. तसे तुलनेने महत्त्वाचे विषय या दोन्ही सभांच्या अजेंड्यावर नाहीत. त्यामुळे त्या एक, दोन दिवस पुढे ढकलल्या,तरी काही विशेष फरक पडणार नाही, असे सत्ताधारी व विरोधी पक्षांचेही मत पडले आहे. दरम्यान, या सभा नंतर दोन-चार दिवसांतच होण्याची शक्‍यता आहे. 
 

संबंधित लेख