Pimpri Chinchawad citizens will be given good service : CP Padmnabhan | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना चोख सेवा देऊ : पोलिस आयुक्त आर.के.पद्मनाभन 

सरकारनामा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्तालय स्वातंत्र्यदिनी सुरू झाले.पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री
गिरीश बापट यांनी ध्वजारोहण करून आयुक्तालय सुरू केल्याची घोषणा केली.

पिंपरी :   पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्तालय स्वातंत्र्यदिनी सुरू झाले.पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री
गिरीश बापट यांनी ध्वजारोहण करून आयुक्तालय सुरू केल्याची घोषणा केली. सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून पिंपरी चिंचवड येथील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने आयुक्तालयासाठी आपल्या शाळेची इमारत देऊ केलीआहे. मात्र, तिथे फर्निचरचे काम सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात पालिकेच्याच ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये ते आज सुरू करण्यात आले. लवकरच नव्या इमारतीमध्ये पोलिस आयुक्तालयाचे काम सुरू होईल, असे बापट यावेळी म्हणाले. 

पोलिसांनी लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्याशी समन्वय ठेवून काम करावे,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शहरवासीयांना चोख सेवा देऊ, असे आयुक्तालयाचे पहिले पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले.

 भाजपचे राज्यसभा सदस्य अमर साबळे, मावळचे
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, पिंपरीचे शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार, भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपायुक्त विनायक ढाकणे, उपयुक्त पाटील, उपायुक्त नमिता पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख