पिंपरी-चिंचवडमध्ये कोणाचेही काम करा, मराठा मोर्चाची कार्यकर्त्यांना मुभा 

पिंपरी-चिंचवडमध्ये कोणाचेही काम करा, मराठा मोर्चाची कार्यकर्त्यांना मुभा 

पिंपरी : लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. त्याचवेळी कुठल्याही पक्षाचे काम करण्यास मुभा दिली आहे. मात्र, हे काम करताना मोर्चाचे बॅंनर न लावण्यास सांगण्यात आले आहे. 

दरम्यान,या निर्णयामुळे मराठा समाजाच्या मते शहरात राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी विभागली जाणार आहेत. फाटाफूट होणार आहे. कारण हेच मुख्य उमेदवार असून ते दोघेही मराठा समाजाचेच आहेत. समाज या दोन्ही पक्षांत शहरात विभागला गेलेला आहे. त्यामुळे मतांची विभागणी होणारच होती. त्यामुळेच मोर्चाने हा निर्णय घेतल्याचे समजते. 

वर्षानंतर आरक्षण प्रश्नी एकत्र आलेल्या मराठा समाजामध्ये फूट पडू नये व तो पुन्हा विखुरला जाऊ नये या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे मोर्चाचे राज्य समन्वयक जीवन बोराडे यांनी सरकारनामा सांगितले. क्रांती मोर्चा पाठिंब्याच्या राजकारणापासून अलिप्त आहे. म्हणून कोणत्या पक्षाला पाठींबा द्यायचा किंवा नाही असा कोणताही निर्णय मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवडच्या वतीने घेण्यात आलेला नाही,असे त्यांनी सांगितले. 

मोर्चाच्या बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. बोराडे, प्रविण पाटील, प्रतिक इंगळे, सतीश काळे,सागर तापकीर,धनाजी येळकर, अभिषेक म्हसे, दत्ता शिंदे,दादासाहेब पाटील आदी या बैठकीला उपस्थित होते. 

या संदर्भात बोराडे म्हणाले, मराठा क्रांती मोर्चा ही एक सामाजिक चळवळ आहे.ती राजकारणाचा अड्डा किंवा राजकारण करण्याचे ठिकाण नव्हे. मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्वसामान्य मराठा तसेच जे कोणत्याही पक्षामध्ये नाहीत असे तरुण व जे सर्वच पक्षामध्ये विखुरले गेलेले तरुण एकाच ध्येयासाठी एकत्र आलेले आहेत. येथे फक्त मराठा समाजाची उन्नती, उत्कर्ष ,मराठा आरक्षण व प्रलंबित सामाजिक मागण्या हेच उद्दिष्ट आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com