तुकाराम मुंडेंपेक्षा हिटलर बरा...त्यांना परत पाठवा! 

तुकाराम मुंडेंपेक्षा हिटलर बरा...त्यांना परत पाठवा! 

पिंपरीः पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा राज्य शासनाच्या सेवेत पाठविण्याची जोरदार मागणी आज पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. मुंडे यांनी पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फी केल्याचा निर्णय घेतल्यानंतर पिंपरीच्या स्थायी समितीनेही त्यांच्याविरुद्ध हे टोकाचे पाऊल उचलले. 

गेल्यावर्षीही मुंडे आणि पिंपरीची स्थायी त्यातही स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यात संघर्ष उडाला होता. पिंपरी पालिकेत मुंडे यांनी भेट देऊन येथील समस्या जाणून घ्याव्यात, असे साळवे यांचे म्हणणे होते. तर पिंपरीत न येण्यावर मुंडे ठाम राहिले होते. नंतर चाय पे चर्चा होऊन तो निमाला होता. आज तो पुन्हा उफाळून आला. "मुंडे गो बॅक'ची मागणी स्थायीने केली. तसेच पुन्हा पीसीएमटी स्वतंत्र करून देण्याचा मुद्दाही उपस्थित केला गेला.कर्मचाऱ्यांवर मुंढे यांनी केलेल्या कारवाईवरून स्थायीच्या सदस्यांनीही मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. ते असेपर्यंत पीएमपीएमएलला महापालिकेने पैसे देऊ नयेत,सूचना त्यांनी केली. 

मुंडे यांनी कामावरून काढून टाकलेले अनेक कर्मचारी महापालिकेत आज स्थायी समितीच्या सभासदांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या प्रश्‍नांवरून सदस्यांनी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

सावळे म्हणाल्या, "मुंढे सक्षम अधिकारी असताना पीएमपीएमएलची तूट का वाढली? दिवसाला दोनशे लोक काढून ते सक्षम असल्याचे दाखवून देतात का? सगळेच आयएएस अधिकारी इतरांना शुल्लक समजतात. एवढी तूट आम्ही का भरून द्यायची. असले व्यवस्थापकीय संचालक नकोत आम्हाला. त्यांची कामगिरी असमाधानकारक आहे. त्यांनी हंगामी कर्मचाऱ्यांना काढून टाकले. ते कर्मचारी येथे घेराओ घालून बसले आहेत. त्यांचे म्हणणे तरी ऐकून घ्या. ही कोणती हिटलरशाही आहे? हिटलर पण बरा होता असे म्हणायची वेळ आली आहे.'' 

मुंढे यांची बदली झाल्याशिवाय पीएमपीला पैसे देऊ नयेत, असा बैठकीचा सूर होता. त्यामुळे हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे विचारार्थ पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com