pimpari-standing-committee-last-meet | Sarkarnama

पिंपरीच्या स्थायी समितीची जाताना जोरदार बॅटिंग 

उत्तम कुटे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने आज शेवटच्या सभेत 565 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली. या समितीने वर्षभरात तीन हजार कोटींचे विषय संमत केल्याचा अंदाज आहे. ही पालिकेच्या इतिहासातील विक्रमी कामगिरी आहे. आजच समितीच्या 16 सदस्यांपैकी निम्या जणांचा कार्यकाळ संपला. त्यात समिती अध्यक्षा सीमा सावळे यांचाही समावेश आहे. पुढील महिन्यापासून पुनर्रचित समिती अस्तित्वात येणार आहे. तिची पहिली बैठक 7 तारखेला होणार आहे. त्यात समिती अध्यक्ष निवडला जाणार आहे. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने आज शेवटच्या सभेत 565 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली. या समितीने वर्षभरात तीन हजार कोटींचे विषय संमत केल्याचा अंदाज आहे. ही पालिकेच्या इतिहासातील विक्रमी कामगिरी आहे. आजच समितीच्या 16 सदस्यांपैकी निम्या जणांचा कार्यकाळ संपला. त्यात समिती अध्यक्षा सीमा सावळे यांचाही समावेश आहे. पुढील महिन्यापासून पुनर्रचित समिती अस्तित्वात येणार आहे. तिची पहिली बैठक 7 तारखेला होणार आहे. त्यात समिती अध्यक्ष निवडला जाणार आहे. 

गेल्या वर्षी भाजप पालिकेत प्रथमच सत्तेत आला. सीमा सावळे या भाजपच्या पहिल्या स्थायी समिती अध्यक्षा झाल्या. त्यांच्या वर्षभराच्या काळात विक्रमी कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच त्यांच्यासह समितीवर निविदेत अनियमततेचे तसेच पालिकेला नुकसान पोचवल्याचे आरोप विरोधकांनी केले. त्यांचे खासदार अमर साबळे यांनीही स्थायीच्या गैरकारभाराविषयी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार केली. दरम्यान, पालिकेच्या तीन प्रकरणांत मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू केली आहे. 

वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, रस्ते विकसित करणे, रस्त्यावर डांबरीकरण करण्याच्या कोट्यवधीच्या मोठ्या विषयांचा मंजुरी दिलेल्यात समावेश आहे. त्याजोडीने इतरही काही कोटींच्या व लाखांतील कामांना मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे होत्या.  
 

संबंधित लेख