pimpari-standing-committee-election | Sarkarnama

पिंपरीत स्थायी अध्यक्षपदासाठीची चुरस शिगेला; दावेदार वाढले 

उत्तम कुटे
शुक्रवार, 2 मार्च 2018

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष निवडीतून शहर भाजपमधील नव्या, जुन्या वादाने आता पुढचे वळण घेतले आहे. स्थायी अध्यक्षपदासाठी नव्या आणि जुन्या नगरसेवकांत संघर्ष चालू असतानाच आता आणखी एका जुन्या भाजपाई नगरसेवकाचे नाव या पदासाठी पुढे आले आहे. शहर पक्षातील चाणक्‍यांनी ही खेळी आहे. त्याद्वारे आपल्या कलाने न वागणाऱ्या स्थायी अध्यक्ष पदाच्या शर्यतीतील एकनिष्ठ जुन्या भाजपाईला जुन्याकडूनच शह देऊन सूत्रे आपल्याकडे ठेवण्याची ही चाल आहे. परिणामी स्थायीसाठी शह, काटशहाचे राजकारण चांगलेच रंगले आहे. 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष निवडीतून शहर भाजपमधील नव्या, जुन्या वादाने आता पुढचे वळण घेतले आहे. स्थायी अध्यक्षपदासाठी नव्या आणि जुन्या नगरसेवकांत संघर्ष चालू असतानाच आता आणखी एका जुन्या भाजपाई नगरसेवकाचे नाव या पदासाठी पुढे आले आहे. शहर पक्षातील चाणक्‍यांनी ही खेळी आहे. त्याद्वारे आपल्या कलाने न वागणाऱ्या स्थायी अध्यक्ष पदाच्या शर्यतीतील एकनिष्ठ जुन्या भाजपाईला जुन्याकडूनच शह देऊन सूत्रे आपल्याकडे ठेवण्याची ही चाल आहे. परिणामी स्थायीसाठी शह, काटशहाचे राजकारण चांगलेच रंगले आहे. 

राहुल जाधव (आमदार महेश लांडगे समर्थक नवे भाजप नगरसेवक), शीतल शिंदे व विलास मडिगेरी (जुने एकनिष्ठ भाजपाई) यांची नावे श्रीमंत महापालिकेच्या खजिन्याच्या चावीसाठी म्हणजे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सध्या चर्चेत आहेत. शिंदे व मडिगेरी हे स्वयंभू आहेत. ते अध्यक्ष झाले, तर ते आपल्या ऐकणार नाहीत. म्हणून आपले ऐकेल असा अध्यक्ष करण्याची चाल भाजप चाणक्‍यांनी केली आहे. त्यासाठी मडिगेरी व शिंदे या जुन्या नगरसेवक व स्थायी अध्यक्ष पदाच्या दावेदारांना शह देण्यासाठी प्रा. उत्तम केंदळे या जुन्या व एकनिष्ठ भाजपाईचे नाव पुढे करण्यात आले आहे. ते सध्या स्थायीचे सदस्य आहेत. प्रत्येकाला पद मिळावे म्हणून त्यांच्यासह इतर राहिलेल्या चार आणि चिठ्ठीतून बाहेर पडलेल्या सहा अशा सर्वच्या सर्व दहा सदस्यांचे राजीनामे भाजपने घेतले आहेत. तरीही केंदळे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.त्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

मात्र, राजीनामे घेतले असले, तरी ते मंजूर झालेले नाहीत. त्याची मोठी प्रक्रिया असते. तसेच आम्ही पुढेही कंटिन्यू राहू शकतो, असे केंदळे यांनी यासंदर्भात स्पष्ट केले. आपणच कसे योग्य उमेदवार आहोत, हेसुद्धा त्यांनी सांगितले. आपल्याला शहरातील पक्षाच्या दोन्ही आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांनी स्थायीच्या अध्यक्षपदासाठी प्रदेश व जिल्हा स्तरावर जोरदार फिल्डींग लावली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आणि भाजपशी एकनिष्ठ असलेले केंदळे गेल्या वर्षापासून एकनिष्ठ राहून पक्षातील विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडत आहेत, युवा मोर्चामधे त्यांनी जोमाने काम करत पक्षामधे वेगळी ओळख निर्माण तयार केली आहे. ते उच्चशिक्षित व पक्षाची एकनिष्ठ असल्याने 2017 च्या निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यात त्यांचा मोठ्या मताधिक्‍याने विजय झाला. 

सुशिक्षित असल्याने त्यांना पहिल्या टप्प्यातच स्थायी समितीमधे प्रवेश मिळाला होता. पक्षनेते एकनाथ पवार यांच्याशी असलेली जवळीक त्यांच्या पथ्यावर पडू शकते. सभापतीच्या रेसमधे असणाऱ्या इतरांपेक्षा केंदळे यांची जमेची बाजू म्हणजे ते पक्षाचे निष्ठावान आणि उच्चशिक्षित तसेच स्थायी समितीचा अनुभव असलेले इच्छुकांपैकी ते एकमेव नगरसेवक आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्या नावाचा विचार करू शकतात. 

स्थायी समितीमध्ये अभ्यासू नगरसेवक असतील तरच शहराचा सर्वांगीण विकास होऊ शकेल, अशीच सर्वांची भूमिका आहे. केंदळे हे अभ्यासू आणि अनुभवी असल्यामुळे ते या पदाला योग्य न्याय देतील, असेही काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. वर्षभरात केंदळे यांनी शहराच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मागण्या आणि ठोस पाठपुरावा केला आहे. यंदाच्या बजेटमधेही काही सुधारित सूचना त्यांनी केलेल्या आहेत, यासर्व गोष्टीची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा केंदळे यांनी व्यक्त केली आहे. 

संबंधित लेख