pimpari-Sridevi-corporation | Sarkarnama

श्रीदेवींच्या निधनामुळे पिंपरी महापालिकेची सभा तहकूब 

उत्तम कुटे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी तसेच माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या निधनाने पिंपरी-चिंचवड महापालिकेची बजेटची आजची विशेष सभा स्थगित करण्यात आली. या दोघांचे काल हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहून ही सभा तहकूब करण्यात आली. 

पिंपरीः पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी तसेच माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या निधनाने पिंपरी-चिंचवड महापालिकेची बजेटची आजची विशेष सभा स्थगित करण्यात आली. या दोघांचे काल हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहून ही सभा तहकूब करण्यात आली. 

श्रीदेवी या बुजुर्ग अभिनेत्री, तर धुमाळे हे गेल्या टर्ममध्ये शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक असल्याने त्यांना श्रद्धांजली वाहून सभा 8 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली. महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते. स्थायी समितीने मंजुरी दिलेले पाच हजार 260 कोटी तीस लाख रुपयांच्या बजेटसाठीची ही खास महासभा होती.

गतवेळचे बजेट विरोधकांना चर्चेची कसलीही संधी न देता मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे नंतर मोठे वादंग झाले होते. त्यामुळे यावर्षीच्या बजेटच्या चर्चेकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. मात्र, वरील दोघांसह इतरांच्या निधनाने ही सभाच तहकूब करण्यात आली. त्यामुळे त्यावरील चर्चा व संभाव्य वादावादीही 9 मार्चपर्यंत पुढे गेली आहे. 
 

संबंधित लेख