pimpari-Shivsena-NCP | Sarkarnama

खासदार श्रीरंग बारणेंची निवडणुकीची तयारी सुरू 

उत्तम कुटे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडमधील दोन तरुण माजी नगरसेवक आणि माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानी हा प्रवेश घडवून आणला. त्यातून त्यांनी आगामी निवडणूक तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत राष्ट्रवादीतून भाजप असे आऊटगोईंग सुरू होते. आता ते शिवसेनेसाठी इनकमिंग सुरू झाले आहे. 

पिंपरीः राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडमधील दोन तरुण माजी नगरसेवक आणि माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानी हा प्रवेश घडवून आणला. त्यातून त्यांनी आगामी निवडणूक तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत राष्ट्रवादीतून भाजप असे आऊटगोईंग सुरू होते. आता ते शिवसेनेसाठी इनकमिंग सुरू झाले आहे. 

रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे आणि किरण मोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी बारणे आणि पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर उपस्थित होते.जितेंद्र ननावरे हे दोन टर्म नगरसेवक होते. गेल्यावर्षी पालिकेच्या सार्वत्रिक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नीला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली होती. मात्र,त्या निवडून आल्या नाही. मोटे हे गेल्या टर्मला नगरसेवक होते. 

तरुणांना शिवसेनेला जोडण्याचे काम करीत असल्याची प्रतिक्रिया बारणे यांनी या प्रवेशावर दिली. पुढील खासदार मीच असल्याचा विश्‍वास वाटायला लागल्याने तरुण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे ते म्हणाले. तर, शिवसेना हा चांगला पक्ष असून नेतृत्वही चांगले असल्याने या पक्षात प्रवेश केल्याचे मोटे यांनी सांगितले. त्यांचे विचार पटत असल्याचे ते म्हणाले. मला भाजपमध्ये वाव आणि संधीही मिळत नव्हती. शिवसेनेत स्वयंफूर्तीने काम करता येईल, असे वाटल्याने या पक्षात आल्याचे ननावरे म्हणाले. 
 

संबंधित लेख