pimpari-shivjayanti | Sarkarnama

शिवसेनेबरोबर पिंपरीत भाजप नगरसेवकाकडून तिथीला जोरदार शिवजयंती साजरी

उत्तम कुटे
रविवार, 4 मार्च 2018

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार की तारखेला साजरी करायची याचा वाद राज्यभर आणि राज्य सरकारातही आहे. सरकार हे तारखेनुसार 19 फेब्रुवारीला ती साजरी करते. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेला भाजपनेही ती नुकतीच साजरी केली. त्यांचा सत्तेतील "मित्र'पक्ष शिवसेना ती तिथीनुसारच दरवर्षी राज्यभर साजरी करते. मात्र, हा तिथी, तारखेचा वाद विसरून हिंदू धर्माप्रमाणे तिथीनुसारच सर्व सण साजरे होत असल्याने आपल्या राजाचाही जयंती सण पिंपरी-चिंचवडमधील भाजपचा नगरसेवक भव्यदिव्य अशी साजरी करीत आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपची राजकीय युती तुटली असली, तरी शिवजयंतीतील त्यांची ही अनोखी युती शहरात चर्चेचा विषय झालेली आहे. 

पिंपरीः छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार की तारखेला साजरी करायची याचा वाद राज्यभर आणि राज्य सरकारातही आहे. सरकार हे तारखेनुसार 19 फेब्रुवारीला ती साजरी करते. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेला भाजपनेही ती नुकतीच साजरी केली. त्यांचा सत्तेतील "मित्र'पक्ष शिवसेना ती तिथीनुसारच दरवर्षी राज्यभर साजरी करते. मात्र, हा तिथी, तारखेचा वाद विसरून हिंदू धर्माप्रमाणे तिथीनुसारच सर्व सण साजरे होत असल्याने आपल्या राजाचाही जयंती सण पिंपरी-चिंचवडमधील भाजपचा नगरसेवक भव्यदिव्य अशी साजरी करीत आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपची राजकीय युती तुटली असली, तरी शिवजयंतीतील त्यांची ही अनोखी युती शहरात चर्चेचा विषय झालेली आहे. 

संदीप वाघेरे असे या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. ते पहिल्यांदाच भाजपकडून निवडून आलेले आहेत. एक दिवस नाही, तर यावर्षी चक्‍क दहा दिवस त्यांनी ही जयंती साजरी केली आहे. एक गाव, एक शिवजयंती या न्यायानुसार पिंपरीत ही शिवजयंती तेथील सर्व मंडळांना एकत्र घेऊन अतिशय भव्य प्रमाणात साजरी केली जाते. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले जाते. गरजू व्यक्ती व संस्थांना मदतही दरवर्षी केली जाते. दरवर्षी एका किल्यावर पिंपरीतील पन्नासेक तरुण शिवजयंतीच्या आदल्या रात्री जातात. तेथे मध्यरात्री मशाल (ज्योत) पेटविली जाते. तेथून ती घेऊन चालत हे तरुण पिंपरीत येतात. यावर्षी लोहगडावरून अशी ज्योत आणली आहे. शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड यासारखे पुणे जिल्ह्यातील सर्व किल्यांवर अशा पद्धतीने त्यांची शिवजयंती साजरी करून झाली आहे. हैदराबादचा टायगर अशी ओळख असलेले आंध्रप्रदेशचे भाजपचे आमदार राजा ठाकूर यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान हे यावर्षीच्या वाघेरे यांच्या शिवजयंतीचे प्रमुख आकर्षण होते. 

भाजपचे असूनही शिवसेनेप्रमाणे तिथीला शिवजयंती शिवसेनेपेक्षाही मोठ्या धडाक्‍यात का साजरी करता यावरील त्यांचे उत्तर पटणारे असेच होते. तिथी व तारखेच्या वादात मला जायचेच नाही, असे सांगत आपण शिवजयंती तिथीलाच का साजरी करतो, याची कारणमीमांसा त्यांनी केली. ते म्हणाले, ""हिंदू धर्माचे सर्व सण तारखेनुसार नाही, तर तिथीनुसारच साजरे केले जातात. त्याला सर्वांत मोठा सण असलेला दिवाळीही अपवाद नाही. म्हणून माझ्या राजाची जयंती मी तिथीलाच साजरी करतो. मी वयाच्या 12 वर्षापासून ती साजरी करीत आहे.''
 

संबंधित लेख