pimpari-sarnama-impact-corporator-flex | Sarkarnama

नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ पाट्या लावण्याचे धोरण पिंपरी पालिकेने गुंडाळले 

उत्तम कुटे
शुक्रवार, 2 मार्च 2018

विद्यमान; तसेच गत टर्ममधील नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या नावाची फक्त एकच पाटी लावण्याचा विषय पिंपरी पालिकेने दफ्तरी दाखल केला आहे. "आता पिंपरी पालिकाच लावणार आजी, माजी नगरसेवकांच्या नावांच्या पाट्या' या हेडिंगखाली नुकतेच (ता.27) "सरकारनामा'ने वृत्त व्हायरल केले होते. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोचणार असल्याचे या बातमीत म्हटले होते. त्याची दखल घेत पालिकेतील सत्ताधारी भाजपने नुकत्याच (ता.28) झालेल्या पालिका सभेत हा विषय मंजूर न करता तो दफ्तरी दाखल करण्यात आला. 

पिंपरी : विद्यमान; तसेच गत टर्ममधील नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या नावाची फक्त एकच पाटी लावण्याचा विषय पिंपरी पालिकेने दफ्तरी दाखल केला आहे. "आता पिंपरी पालिकाच लावणार आजी, माजी नगरसेवकांच्या नावांच्या पाट्या' या हेडिंगखाली नुकतेच (ता.27) "सरकारनामा'ने वृत्त व्हायरल केले होते. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोचणार असल्याचे या बातमीत म्हटले होते. त्याची दखल घेत पालिकेतील सत्ताधारी भाजपने नुकत्याच (ता.28) झालेल्या पालिका सभेत हा विषय मंजूर न करता तो दफ्तरी दाखल करण्यात आला. 

आजी, माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या घराजवळ त्यांच्या नावाचा एका विशिष्ट प्रकारचा व रंगातील फलक लावण्याचे हे धोरण होते. स्थायी समितीच्या सांगण्यावरून पालिका प्रशासनाने हा विषय मंजुरीसाठी पालिका सभेसमोर ठेवला होता. अगोदरच अनधिकृत फ्लेक्‍सची बजबजपुरी झाली आहे. त्यात या धोरणामुळे आणखी 266 फलकांची भर पडणार होती. शिवाय त्यासाठी लाखो रुपये खर्चही होणार होते,याकडे "सरकारनामा'ने लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन या विषयाला मंजुरी न देता तो दफ्तरी दाखल करण्यात आला. 

दरम्यान, नामफलकाचे नवे धोरण न आल्याने सध्या शहरात असलेले नगरसेवक व माजी नगरसेवकांच्या नावांचे मल्टीकलर आणि मल्टीसाइजचे एकापेक्षा अधिक फलक तसेच कायम राहणार आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरणही कायम राहणार आहे. 
पालिकेतर्फे नगरसेवकांच्या मागणीनुसार त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयाकडे जाण्यासाठी दिशा दर्शविणारे नामफलक लावले जातात. शहरात एका नगरसेवकाचे असे चार ते पाच वेगवेगळे नामफलक लावले गेले आहेत. त्यामुळे नामफलकाबाबत धोरण ठरविण्याच्या सूचना स्थायी समितीने प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्थायी समितीने केलेल्या सूचनेनुसार नामफलकाबाबतचे (फक्त एकच फलकाचे) धोरण तयार केले होते. 
 

संबंधित लेख