पिंपरी-चिंचवडमधील मॉडेल वॉर्ड आता भाजपच्या रडारवर

पिंपरी-चिंचवडमधील मॉडेल वॉर्ड आता भाजपच्या रडारवर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपने माजी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काळातील संशयास्पद कामांच्या चौकशीस सुरवात केली आहे. त्यातून अंदाजे पाऊणशे कोटी रुपये रुपये खर्च झालेल्या संभाजीनगर व सांगवी येथील तीन मॉडेल वॉर्ड प्रथम त्यांनी रडारवर घेतले आहेत. या मॉडेल वॉर्डवरील खर्चाची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीने
मंगळवारी (ता. 25) दिले. त्यातून प्रमुख विरोधक राष्ट्रवादी व त्यांच्या प्रमुख नेत्या मंगला कदम व इतर पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा नव्या
सत्ताधाऱ्यांचा मानस आहे.

महिन्याभराच्या विलंबाने सादर झालेल्या 2017-18 च्या बजेटला मंजुरी देण्याच्या विशेष सभेत वरील आदेश समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिला. ही चौकशी होईपर्यंत संबंधित कंत्राटदारांची बिले न देण्यासही त्यांनी
बजावले आहे. मावळत्या सभागृहातील सत्तारूढ पक्षनेत्या कदम यांच्या संभाजीनगरमध्ये (प्रभाग क्र.9) प्रथम व नंतर सांगवी येथील 58 व 60 प्रभागात हे मॉडेल वॉर्डचे काम झाले आहे. सांगवीतील प्रभाग हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व स्थायीचे माजी सभापती नवनाथ जगताप, प्रशांत शितोळे आणि माजी नगरसेविका सोनाली जम आणि शैलजा शितोळे यांचे होते. कालच (ता.24) प्रशांत शितोळे यांनी भाजपवरच भ्रष्टाचारासह इतर आरोप केले होते.

राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात झालेल्या विकासकामांच्या चौकशीचे आव्हानही त्यांनी दिले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा चौकशीचा आदेश सत्ताधारी भाजपने दिल्याने या योगायोगाची चर्चा लगेच सुरू झाली. मॉडेल वॉर्डच्या कामात अनागोंदी झाल्याने त्या कामाच्या चौकशीची गरज असल्याने तसा आदेश दिल्याने सावळे यांनी सांगितले. मॉडेल र्डातील विकासकामांच्या निविदा प्रक्रियेपासून ती केली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com