Pimpari news - smart city, smart toilet | Sarkarnama

स्मार्ट सिटीत आता स्मार्ट टॉयलेटही 

उत्तम कुटे 
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

स्वच्छ पुरस्कारप्राप्त पिंपरी-चिंचवड शहराला उघड्यावरील शौचाप्रमाणे पुरेशा महिला स्वच्छतागृहांची वानवा हा सुद्धा "स्मार्ट सिटी'बनण्यासाठी अडसर ठरत आहे.त्यामुळे "ती'च्यासाठी महापालिकेने आता स्मार्ट सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यास सुरवात केली आहे. तशी मागणी पालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी करीत भाजपला घरचा आहेर दिला होता. त्याची दखल घेत आता "ती'ची कुचंबणा दूर करण्यास पालिकेने सुरवात केली आहे. 

पिंपरी : स्वच्छ पुरस्कारप्राप्त पिंपरी-चिंचवड शहराला उघड्यावरील शौचाप्रमाणे पुरेशा महिला स्वच्छतागृहांची वानवा हा सुद्धा "स्मार्ट सिटी'बनण्यासाठी अडसर ठरत आहे.त्यामुळे "ती'च्यासाठी महापालिकेने आता स्मार्ट सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यास सुरवात केली आहे. तशी मागणी पालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी करीत भाजपला घरचा आहेर दिला होता. त्याची दखल घेत आता "ती'ची कुचंबणा दूर करण्यास पालिकेने सुरवात केली आहे. 

स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळवून आता स्मार्ट शहराकडे घौडदौड सुरू केलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची बोंबच आहे. त्यातही महिलांसाठी अशी स्वच्छतागृहेच नसल्याने त्यांची मोठी कुचंबणा होत आहे. असलेली काही स्वच्छतागृहे पाडली जात आहेत. बाकीची अस्वच्छ आहेत.त्यामुळे बाजारपेठ, बसथांबा आदी सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी विशेषकरून महिलांची मोठी कुचंबणा सुरू आहे. त्यात अजूनही शहरात काही ठिकाणी उघड्यावर शौच केला जातो. पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकाने मोशी येथे नुकतीच उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली आहे. तर, स्वच्छतागृह नसलेल्या ठिकाणी (झोपडपट्टी) पालिकेची फिरती स्वच्छतागृहे अजूनही ठाण मांडून आहेत. त्याचा स्मार्ट होण्यात शहराला अडथळा ठरत होता. 

त्यामुळे शहरात पालिकेने महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधावीत अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व महिला बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर यांच्याकडे गोरखे यांनी केली होती. स्वच्छतागृहाअभावी महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. 
 

संबंधित लेख