पुण्यामुळे `राष्ट्रवादी'चे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्षपद लांबणीवर

पुणे जिल्ह्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अध्यक्ष नुकताच मिळाला आहे. आता बारी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराची आहे. मात्र, दीपक मानकर प्रकरण आणि एकमताअभावी पुणे शहराचे अध्यक्षपद लांबणीवर पडले आहे, असे `राष्ट्रवादीती'ल विश्वसनीय सूत्रांनी आज `सरकारनामा'ला सांगितले.
पुण्यामुळे `राष्ट्रवादी'चे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्षपद लांबणीवर

पिंपरीः पुणे जिल्ह्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अध्यक्ष नुकताच मिळाला आहे. आता बारी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराची आहे. मात्र, दीपक मानकर प्रकरण आणि एकमताअभावी पुणे शहराचे अध्यक्षपद लांबणीवर पडले आहे, असे `राष्ट्रवादीती'ल विश्वसनीय सूत्रांनी आज `सरकारनामा'ला सांगितले. 

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष निवडीची घोषणा राष्ट्रवादी एकाच वेळी करणार असल्याने पुण्याच्या घोळामुळे पिंपरीची निवड, तेथे ती वादातीत नसताना एकमत असूनही रखडली आहे.

राज्यातील 24 जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका राष्ट्रवादीने या महिन्यात केल्या. तेथे वाद नव्हता. तसेच एकमतही होते. त्यामुळे त्या लगेच करण्यात आल्या. त्यात पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. मात्र, पुणे शहरात शहराध्यक्षपदासाठी एकापेक्षा अधिकजण शर्यतीत आहेत. दीपक मानकर, सुभाष जगताप आणि विशाल तांबे यांची नावे घेतली जात आहेत. त्यात प्रमुख दावेदार मानकर हे नुकतेच एका गुन्ह्यात अडकले. त्यामुळे या निवडीला आणखी खीळ बसली. परिणामी पहिल्या टप्यातील निवडीनंतर दोन आठवड्यात होणाऱ्या राज्यातील इतर जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या निवडीही काहीशा खोळंबल्या गेल्याचे पक्षातूनच सांगण्यात आले. त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे.
 
अद्याप पक्षाच्या 44 जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या होणे बाकी आहे. त्या दोन टप्यात अपेक्षित आहेत. त्यातही वाद नसलेल्या व कमी स्पर्धा असलेल्या राज्यातील जिल्ह्यात त्या या महिन्याअखेर होण्याची दाट शक्यता आहे. त्यात पिंपरी होते. येथे शहराध्यक्षपदासाठी फक्त संजोग वाघेरे-पाटील हेच शर्यतीत आहेत. तेच विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनाच रिपिट केले जाण्याची शक्यता आहे. लोकसभेचे मावळमधील पक्षाचे उमेदवार म्हणूनही त्यांच्या नावाची चर्चा आहे. त्त्यामुळे ही उमेदवारी फक्त त्यांच्या अध्यक्षपदाच्या आड येण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या तुलनेत पिंपरीत शहराध्यक्ष निवडीचा तिढा नाही. मात्र, पुणे शहर व पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हाध्यक्षांच्याही निवडी त्याबरोबर करायच्या आहेत. त्यामुळे पिंपरीची फरफट सुरु आहे. दुसरीकडे 11 महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली आहे. त्यामुळे पक्षबांधणी व निवडणुक तयारीसाठी नवीन अध्यक्षांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून या निवडी तातडीने करण्याची मागणी पक्षातून केली जात आहे. ती विचारात घेऊन तोडगा काढून लवकरच या नियुक्त्या होतील, असे `राष्ट्रवादी'च्या जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले.
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com