पिंपरीत `राष्ट्रवादी'कडे उमेदवाराचा दुष्काळ, भाजपकडे सुकाळ 

भाजप आणि शिवसेनेने पिंपरीत विधानसभेला कंबर कसलेली आहे. शिवसेना, भाजपने निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. भाजपकडे, तर एक नव्हे, तर दोघे तयारीत आहेत. मात्र, या मतदारसंघाचे पहिले आमदार असलेल्या राष्ट्रवादीच्या गोटात अद्याप सामसूम आहे. ते शिवसेना आणि भाजपला पुरून उरेल अशा बलशाली उमेदवाराच्या शोधात आहेत. तूर्त त्यांच्याकडे या राखीव मतदारसंघाचे पहिले आमदार अण्णा बनसोडे हा एकच पर्याय सध्या उपलब्ध आहे.
पिंपरीत `राष्ट्रवादी'कडे उमेदवाराचा दुष्काळ, भाजपकडे सुकाळ 

पिंपरीः भाजप आणि शिवसेनेने पिंपरीत विधानसभेला कंबर कसलेली आहे. शिवसेना, भाजपने निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. भाजपकडे, तर एक नव्हे, तर दोघे तयारीत आहेत. मात्र, या मतदारसंघाचे पहिले आमदार असलेल्या राष्ट्रवादीच्या गोटात अद्याप सामसूम आहे. ते शिवसेना आणि भाजपला पुरून उरेल अशा बलशाली उमेदवाराच्या शोधात आहेत. तूर्त त्यांच्याकडे या राखीव मतदारसंघाचे पहिले आमदार अण्णा बनसोडे हा एकच पर्याय सध्या उपलब्ध आहे. 

शिवसेनेचे विद्यमान आमदार ऍड.गौतम चाबुकस्वार यांनी पुन्हा आपण शिवसेनेकडून लढणार असल्याचे "सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.आरपीआयकडून गतवेळच्या या पक्षाच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांनीही तयारी सुरू केली आहे. त्या यावेळीही उमेदवार असतील, तर त्यांची उमेदवारीची हॅटट्रिक होणार आहे. 

भाजपकडून स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे तीव्र इच्छुक आहेत. मात्र, त्यांचा प्रभाग भोसरीत मोडतो. तसेच स्थायीतील कामांची चौकशी लागल्याने त्या काहीशा अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी कितपत मिळू शकतो, याविषयी राजकीय जाणकार साशंक आहेत. त्यामुळे अमित गोरखे या तरुण सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव भाजपमधून पुढे आले आहे. त्यांनीही त्याला दुजोरा दिला. आपल्याला ही संधी दिली, तर त्याचे आपण सोने करू,असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीकडे बनसोडे हा सध्या एकच समर्थ पर्याय आहे. मात्र,ते भाजपमध्ये 
जाणार अशी आवई मध्ये उठली होती.त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाईल, का हा पहिला प्रश्‍न आहे. त्यांनी,मात्र आपण पुन्हा पिंपरीतून लढण्यासाठी राष्ट्रवादीकडून तयार असल्याचे सांगितले. 

गतवेळी पिंपरीची लढत तिरंगी झाली होती. त्यावेळी आघाडी नव्हती. युतीचाही काडीमोड झाला होता. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसची मते विभागून शिवसेनेचा निसटता विजय झाला होता. यावेळी, मात्र येथे चौरंगी लढत होईल, असे वाटते. युती नसल्याने त्यांचे दोन्ही उमेदवार असतील. दोन्ही कॉंग्रेसचीही अद्याप आघाडी झालेली नाही. ती होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांचा एक उमेदवार असू शकतो. 

आरपीआयला ही जागा भाजपने सोडली नाही,तर त्यांच्या चंद्रकांत सोनकांबळे या बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. आम्हाला ही जागा मिळाली नाही,तर येथे भाजपही विजयी होणार नाही, असे सांगत त्यांनी बंडाचे निशाण आताच रोवले आहे.ऐनवेळी भाजप व शिवसेनेचे उमेदवार बदलू शकतात. राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले अण्णा बनसोडे हे ऐनवेळी भाजपकडून, तर भाजपच्या दावेदार सीमा सावळे या शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी उभ्या राहिल्या,तरी आश्‍चर्य वाटणार नाही. 

पिंपरी हा पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी सर्वांत लहान विधानसभा मतदारसंघ. त्याच्या निर्मितीपासून आतापर्यंत उमेदवारीपासून विशेष गडबड गोंधळ झालेला नाही.मात्र, यावेळी तो होण्याची मोठी शक्‍यता आहे. गेल्यावेळी भाजप,शिवसेना युती नव्हती.ती यावेळी नसणार आहे. त्यामुळे त्यांच्यातील मताच्या फाटाफुटीचा लाभ राष्ट्रवादीला होणार का ही उत्सुकता आहे. 

दुसरीकडे आघाडीचा लाभ राष्ट्रवादीला होणार आहे. गेल्यावेळी नसलेली दोन्ही कॉंग्रेसची आघाडी यावेळी भाजपच्या पाडावासाठी होईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे गतवेळी कॉंग्रेसचे उमेदवार मनोज कांबळे यांनी घेतलेल्या 11 हजार 22 मते राष्ट्रवादीकडे वळू शकतात. त्यातून शिवसेनेचा दोन हजार 335 मताची विजयी आघाडी राष्ट्रवादी सहज कापू शकणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com