pimpari-modi-government-sushil-pandit | Sarkarnama

मोदी सरकार राष्ट्रवादी नसून `धृतराष्ट्र'वादी : सुशील पंडित 

उत्तम कुटे
मंगळवार, 6 मार्च 2018

हिंदूंनी 2014 मध्ये मोठ्या आशेने भाजपकडे सत्ता सोपवली. मात्र, मोदी सरकार मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात दंग आहे. 28 वर्षांपूर्वी आम्ही काश्‍मीरमधून विस्थापित झालो. भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा काश्‍मीरमध्ये जाता येईल, असे वाटले होते. परंतु, ही आशा फोल ठरली. हुरियत सारख्या फुटीरतावाद्यांशी काश्‍मीरमधील पीडीपी-भाजप सरकार जवळीक साधत आहे. त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. मोदी सरकार "राष्ट्रवादी' नसून `धृतराष्ट्रवादी' आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काश्‍मिरी विचारवंत सुशील पंडित यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केली. 

पिंपरीः हिंदूंनी 2014 मध्ये मोठ्या आशेने भाजपकडे सत्ता सोपवली. मात्र, मोदी सरकार मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात दंग आहे. 28 वर्षांपूर्वी आम्ही काश्‍मीरमधून विस्थापित झालो. भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा काश्‍मीरमध्ये जाता येईल, असे वाटले होते. परंतु, ही आशा फोल ठरली. हुरियत सारख्या फुटीरतावाद्यांशी काश्‍मीरमधील पीडीपी-भाजप सरकार जवळीक साधत आहे. त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. मोदी सरकार "राष्ट्रवादी' नसून `धृतराष्ट्रवादी' आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काश्‍मिरी विचारवंत सुशील पंडित यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केली. 

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू स्वाभिमान दिन आणि शिवजयंती महोत्सवात पंडित बोलत होते. यावेळी त्यांनी काश्‍मीर आणि देशापुढील इतर अनेक प्रश्नांवर सडेतोड विचार मांडले. 

ते म्हणाले,"काश्‍मीर सध्या धुमसत आहे. अनेक पिढ्यांपासून येथे राहणाऱ्या अनेक हिंदू कुटुंबांवर अन्याय,अत्याचार झाले. त्यामुळे त्यांना विस्थापित व्हावे लागले. आता केवळ दहा ते पंधरा टक्‍के हिंदू काश्‍मीरमध्ये आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर आम्हाला परत काश्‍मीरमध्ये जाता येईल असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही. हिंदुस्थानमध्ये असे होत असेल तर येथील माणूस सुरक्षित नाही, असेच म्हणाले लागेल'' 

ऍड संजीव पुनाळेकर म्हणाले, "देशातील प्रत्येक राज्यात गल्ली-गल्लीत पाकिस्तानी तयार होत आहेत. अशा पाकिस्तानी धार्जिण्यांवर सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी भाषण करत असताना अजाण सुरू झाली. त्यावेळी मोदींनी आपले भाषण दोन मिनिटांसाठी थांबले ही शरमेची बाब आहे. कोरेगाव भीमा येथे उमर खली येतो आणि दलितांना चिथावणी देऊन जातो. त्याच्यावर कारवाई होत नाही. परंतु, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मात्र खटले भरले जातात ही लाजीरवाणी बाब आहे. आमच्यावर खोटे आरोप करणाऱ्या व्यक्‍तींचे सरकार कौतुक का करते, असा प्रश्न पडतो. जोपर्यंत हिंदू जाती-जातीमध्ये भांडत राहील, तोपर्यंत आपण एकत्र येऊ शकत नाही.'' 

 

संबंधित लेख