मनसेकडून पिंपरीत विधानसभेची चाचपणी 

विधानसभा निवडणूक तयारीला लागा, असा आदेश राज ठाकरे यांच्यानंतर `मनसे'त दोन नंबरचे नेते असलेले माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी पक्षाच्या पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आज येथे दिला.
मनसेकडून पिंपरीत विधानसभेची चाचपणी 

पिंपरीः विधानसभा निवडणूक तयारीला लागा, असा आदेश राज ठाकरे यांच्यानंतर `मनसे'त दोन नंबरचे नेते असलेले माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी पक्षाच्या पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आज येथे दिला.

पिंपरीत ते आता जातीने लक्ष घालणार आहेत. त्यांच्यासारखा आक्रमक नेता पिंपरीला मिळाल्याने मनसेचे पिंपरीत अडखळलेले इंजिन आता धावण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा शहरांतील तिन्ही विधानसभा मतदारसंघांचा आढावा त्यांनी घेतला. प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी वन टू वन चर्चा केली. तीन तास ही बैठक सुरू होती. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेने राज्यभर अशा आढावा बैठका घेण्यास सुरवात केली आहे. या बैठक सत्राची अखेर पिंपरी-चिंचवडमध्ये झाली.राज्यातील ही 52 वी बैठक होती.

आपल्या दोन नंबरच्या नेत्याने एवढा वेळ दिल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते भारावून गेल्याचे दिसून आले. आगामी विधानसभा निवडणुकीचे इच्छुकही यावेळी उपस्थित होते. 

राज ठाकरे यांच्या मागील पुणे दौऱ्यात त्यांनी पिंपरीतील पदाधिकाऱ्यांशी पुण्यात चर्चा केली होती. त्यानंतर पक्षाचे दोन नंबरचे नेते प्रथमच शहरात आले होते. त्यामुळे त्याकडे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी शंभर तरुणांनी `मनसे'त प्रवेश केला. 

एकत्र पक्षासाठी काम करा, गटातटाचे राजकारण करू नका, असे नांदगावकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यावेळी बजावले. पक्षाच्या शहर महिलाध्यक्षपदी लवकरच नियुक्ती करू, असे त्यांनी सांगितले.

शहरवासीयांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्‍नी पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com