Pimpari-maratha-reservation-collective-suicide-notice | Sarkarnama

मराठा आरक्षण : सामूहिक आत्महत्येच्या इशाऱ्याने प्रशासन हादरले 

उत्तम कुटे 
मंगळवार, 31 जुलै 2018

पिंपरीः पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवरून उड्या घेत आत्मबलिदान करण्याचा इशारा दिलेल्या मराठी मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न फसल्याने जिल्हा प्रशासन तसेच पोलिस दलही आता हादरले आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी येत्या चार तारखेला ही सामूहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड समन्वयक सतीश काळे व त्यांच्या नऊ सहकाऱ्यांनी दिलेला आहे.आमच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

काळे यांच्यासह धनाजी येळकर-पाटील, वैभव जाधव, अमोल मानकर, प्रवीण बोराडे, भय्यासाहेब राजधने, ज्ञानदेव लोभे, राजू पवार, राजेंद्र देवकर आणि अंतिम जाधव अशी सामूहिक आत्मबलिदानाचा इशारा दिलेल्या तरुणांची नावे आहेत. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इमारत ज्या बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे,त्या ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. 

तत्पूर्वी त्यांनी ते पुणे जिल्हाधिकारी नवलराम आणि पोलिस उपायुक्त (परिमंडळ तीन) गणेश शिंदे यांनाही दिले आहे. ते मिळताच जिल्हा प्रशासन व पोलिसांनी आरक्षणाचा निर्णय अपेक्षित असल्याने हे पाऊल उचलू नका, असे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरक्षणाला काही महिने लागणार असल्याचे लक्षात येताच हे तरुण आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. 

दरम्यान राज्यात व त्यातही मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापेक्षा जास्त आत्महत्या एकाच प्रयत्नात पुण्यात होण्याच्या भीतीने प्रशासन व पोलिसांची तारांबळ उडाली आहे. त्यातून जिल्हाधिकारी इमारतीभोवती बंदोबस्त वाढविण्यात आला असून आत प्रवेश करणाऱ्यांचीही कसून चौकशी केली जात आहे. 

दुसरीकडे येत्या शनिवारी (ता.12) दुपारी बारा वाजता सामूहिक आत्मबलिदान करण्यावर ठाम असल्याचे काळे यांनी आज "सरकारनामा'ला सांगितले. ते म्हणाले,""मराठा व धनगर आरक्षण तातडीने देण्यासह या आंदोलनातील हुतात्म्यांच्या (त्यात पोलिस हवालदार श्‍याम काटगावकर) कुटुंबांना पन्नास लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल मुख्यमंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, हुतात्म्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी,काटगावकरांच्या कुटुंबाला शासकीय घर याही आमच्या मागण्या आहेत. 

संबंधित लेख