pimpari-mamata-gaikwad-standing | Sarkarnama

पहिल्या टर्ममध्येच ममता गायकवाड यांची `स्थायी'च्या अध्यक्षपदाला गवसणी 

उत्तम कुटे
बुधवार, 7 मार्च 2018

सौ. ममता विनायक गायकवाड या प्रथमच भाजपतर्फे प्रभाग 26 मधून निवडून आल्या आहेत. पहिल्याच टर्ममध्ये त्यांची नुसती "स्थायी'वर निवडच झाली नाही, तर त्या थेट समितीच्या अध्यक्षाच झाल्या. अगदी तरुणवयात (वय 26) हा बहुमान मिळविणाऱ्या त्या महिला नगरसेविका आहेत. 

पिंपरी : सौ. ममता विनायक गायकवाड या प्रथमच भाजपतर्फे प्रभाग 26 मधून निवडून आल्या आहेत. पहिल्याच टर्ममध्ये त्यांची नुसती "स्थायी'वर निवडच झाली नाही, तर त्या थेट समितीच्या अध्यक्षाच झाल्या. अगदी तरुणवयात (वय 26) हा बहुमान मिळविणाऱ्या त्या महिला नगरसेविका आहेत. 

ममता गायकवाड यांचे पती विनायक हे गेल्या टर्मला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक होते. ते "स्थायी'चेही सदस्य होते. ममता गायकवाड यांनी पहिल्या टर्ममध्येच "स्थायी'च्या अध्यक्षपदाला गवसणीं घातली. 

ममता गायकवाड यांचा जन्म घाटाखाली दापोली येथे झाला. लग्न झाल्यानंतर त्या घाटावर आल्या. सातारच्या सुनबाई झाल्या. दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. नगरसेवक होण्यापूर्वी त्या गृहिणी होत्या. त्यांची राजकीय कारकिर्द जेमतेम वर्षभराची आहे. युवक, युवती आणि पाणीपुरवठा नियोजन, बचत गट, महिलांना स्वयंरोजगार, गरिब रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून दिल्याचे काम केल्याचा त्यांचा दावा आहे. 
 

संबंधित लेख