`दलितांवर अन्याय नको; कारवाईसाठी पाठपुरावा करू' 

जळगाव येथे दोन दलित (वाल्मीकी समाज) मुलांवर झालेला अत्याचार व अन्याय कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी जगासमोर आणला. त्यात आरोपींना अटक करण्याऐवजी उलट गांधी यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल होतो, याला काय अर्थ आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी "सरकारनामा'ला दिली.
`दलितांवर अन्याय नको; कारवाईसाठी पाठपुरावा करू' 

पिंपरीः जळगाव येथे दोन दलित (वाल्मीकी समाज) मुलांवर झालेला अत्याचार व अन्याय कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी जगासमोर आणला. त्यात आरोपींना अटक करण्याऐवजी उलट गांधी यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल होतो, याला काय अर्थ आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी "सरकारनामा'ला दिली. 

आरोपींना अटक करण्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असून विधिमंडळाबाहेर शिवसेना आमदारांसह धरणेही धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, दलित समाजावरील अत्याचार व अन्याय थांबण्याची गरज असून त्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा करू, असे भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेशदादा लांडगे म्हणाले. 

पिंपरी राखीव मतदारसंघाचे आमदार असलेले ऍड. चाबुकस्वार यांनी जळगाव येथील आठ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून झाल्याचे प्रकरणही विधानसभेत मांडणार असल्याचे सांगितले. 

जळगाव येथील अत्याचाराविषयी ते म्हणाले, की राहुल गांधी भले कॉंग्रेसचे असोत, त्यांनी सोशल मिडियाव्दारे (ट्‌वीटर)दलितांवरील हा अन्याय जगासमोर आणला. त्यामुळे त्यातील आरोपींना तातडीने अटक करण्याऐवजी गांधी यांच्याविरुद्धच कारवाई होते, याला काय अर्थ आहे. ते काहीही बोलले, तरी त्यांच्याविरुद्ध सगळा भाजप एकत्र येतो आहे. जळगाव प्रकरणाला गांधी यांनी वाचा फोडली आहे, भाजपने नाही. त्यातील आरोपीच्या पाठी राजकीय शक्ती असल्याने त्यांना अटक झालेली नाही. मात्र, त्यासाठी मी हे प्रकरण विधिमंडळात लावून धरणार आहे. तसेच विधीमंडळाबाहेर आंदोलनही करणार आहे. जळगाव येथील दोन्ही अत्याचाराची प्रकरणे विधानसभेत उचलणार आहे. 

आमदार लांडगे यांनीही जळगावसारख्या घटना रोखल्या जाण्याची गरज प्रतिपादित केली. त्यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करू, असेही ते म्हणाले. तसेच जळगाव घटनेतील आरोपींविरुद्ध कारवाईसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावाही करू, असे त्यांनी सांगितले. 
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com